अवैधरित्या गोवा परराज्यातील बनावटीचे विदेशी मद्य चारचाकी वाहनातून वाहतुक करताना एका इसमास अटक.
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
कोल्हापूर : दिनांक २६/१०/२०२३ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कागल विभागाने पुणे-बेंगलोर हायवेवरून बेकायदा गोवा बनावट मदयाची अवैदयरित्या चोरटी वाहतुक होणार असलेची गुप्त बातमी मिळाली त्यानुसार या मार्गावर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कणेरीवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर या गावच्या हददीत पुणे- बेंगलोर हायवेवर हॉटेल ग्रीन लॅन्ड समोर रोडवर दबा धरुन पाळत ठेवली असताना मध्यरात्री ०१.३० सुमारास बातमीतील वर्णनाप्रमाणे एक पांढ-या रंगाचा मारूती सुझुकी स्विफट वाहन क्र.MH.४६.P.१३४१ हे चार चाकी वाहन कागलकडुन येत असल्याचे दिसले सदर वाहनास थांबवुन वाहनच ालकाला वाहनामध्ये काय माल आहे याची विचारणा केली असता वाहनात काही नसल्याचे रिकामे असल्याचे सांगितले त्यानुसार पथकातील कर्मचा-यांनी पाहणी केली असता वाहनाच्या मधील शीट वरती तसेच मागील डीकीत गोवा बनावट विदेशी मदयाचे बॉक्स एकावर एक असे रचुन ठेवलेले मिळुन आले. सदर ठिकाणी मारूती सुझुकी कंपनीची स्विफट VDI BS IV मॉडेलची चारचाकी वाहन क्र.MH.४६.P.१३४१ या वाहनासह एकुण २ लिटरचे २१ व ७५० मिलीचे ०६ मद्याचे बॉक्स जप्त करुन वाहनचालक नितीन ज्ञानदेव वासुदेव वय वर्षे ३१ रा.मु.पो.भेंडवडे, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर यास ताब्यात घेतले असुन मुद्येमालासह इसम मिळुन आला आहे.
सदर छाप्यात वाहनामध्ये गोवा राज्य बनावट विदेशी मदयाचे विविध ब्रँडचे २००० मिलीचे व्हिस्कीचे एकूण २१ बॉक्स (८५ सिलबंद बाटल्या) व ७५० मिलीचे एकूण ०६ बॉक्स (७२ सिलबंद बाटल्या) जप्त, सह एकुण २७ बॉक्स इतके मदय मिळुन आले असुन त्याची बाजारभावानुसार एकुण रु.२,२९,४४०/- इतकी किंमत असुन
गुन्हयांत मिळुन आलेले वाहन व मोबाईल संच यांच्यासह एकुण जप्त मुद्येमालाची किंमत रु.४,७६,४४०/- इतकी आहे.
सदर आरोपीत इसम हा बेकायदेशीर गोवा बनावट विदेशी मदयाची अवैदयरित्या वाहतुक करित असताना मुद्येमालासह मिळुन आला म्हणून त्यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम चे कलम ६५ (a) (e),८१,९० व १०८ नुसार गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाई कोल्हापूर विभागाचे मा. विभागीय उप आयुक्त, श्री. विजय चिंचाळकरसो व मा. अधीक्षक श्री. रविंद्र आवळेसो, उपअधीक्षक श्री. राजाराम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कागल विभागाचे निरीक्षक श्री. जगन्नाथ पाटील,निरीक्षक श्री.संभाजी बरगे, उपनिरीक्षक श्री. नारायण रोटे, श्री. कृष्णात शेलार, श्री. शितल शिंदे, जवान सर्वश्री योगराज दळवी, सचिन काळेल, बलराम पाटील, अमर पाटील, सागर शिंदे, दिपक कापसे, अनिल दांगड व विशाल आळतेकर यांनी कारवाई केली.
सदर गुन्हयाचा अधिक तपास निरीक्षक, श्री. जगन्नाथ पाटील हे करीत आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636