आज पुन्हा पुणे शहरात रिक्षा बंद


अन्वरअली शेख

पुणे शहर दी.25,आज शहरात रिक्षा वा ऑन लाईन मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे  सर्विसेस पुरवणाऱ्या संघटनेतर्फे विविध मागण्या सरकार तर्फे मान्य करण्यात याव्या म्हणून एक दिवसीय लाक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे. बंद कशाप्रकारे असणार आहे त्याची रूपरेखा लिखित पत्रकारद्वारे संघटने कडून जाहीर करण्यात

 25 ऑक्टोबर 23 च्या बंद ची कार्यक्रम पत्रिका

इंडियन गिग वर्कर्स फ्रंट ( I. G. F ) तर्फे महाराष्ट्रातील तमाम गिग वर्कर्स ला, म्हणजेच ओला, उबर, स्वीगी, झोमॅटो व इतर मोबाईल अँप्लिकेशन्स वर काम करणाऱ्या कॅब, रिक्षा चालक व डिलिव्हरी बॉईज ना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या मागण्यांसाठी आपण उत्स्फूर्तपणे, कायदेशीर व संवैधानिक मार्गाने एक दिवसीय लाक्षणिक बंद पाळावा.

 सदर बंद २४ ऑक्टोबर २३ रोजी रात्री ११:५९ वा सुरु होईल व २५ ऑक्टोबर २३ रोजी रात्री ११:५९ वा संपेल.

 बंद दरम्यान करण्याची कामे

– बंदच्या दिवशी युवकांनी आपापल्या परिसरातील महापुरुषांच्या स्मारकावर जाऊन त्यांना अभिवादन करून, आपल्या प्रश्नांवर चर्चा करावी, एकमेकांशी ओळख वाढवून आपले संघटन मजबूत करावे तसेच त्याचे व्हिडिओ व फोटो काढून, ते आपल्या व्हॉट्स ॲप ग्रुप वर सेंड करावेत किंवा फेसबुक वर #IGF250CT असे टॅग करावे.

 कोठेही आंदोलन किंवा निदर्शने करण्यास संघटनेची मनाई

आपली पहिली पायरी असून, यावेळेस आपण कोठेही आंदोलने किंवा निदर्शने आयोजित केलेली नसून आपल्याला बंद कायदेशीर, अहिंसक व संवैधानिक मार्गाने यशस्वी करायचा आहे.

२५ ऑक्टोबर २३ ला आपण एकदिवसीय बंद आंदोलन का करत आहोत ?

 कॅब चालकांचे प्रमुख प्रश्न व समस्या आणि विविध मागण्या

1) रिक्षा टॅक्सी मीटर सारखेच कॅबचे बेस दर सुद्धा फिक्स असावेत त्यासाठी खतुआ समितीची शिफारस स्वीकारावी.

2) एव्हरेस्ट फ्लीट सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य कॅब चालकाचा व्यवसाय या कंपन्यांनी मारू नये व सदर फ्लित्वर त्वरित नियंत्रण आणावे.

3) प्रायव्हेट वेंडर्स नेमून त्यांच्या माध्यमातून सामान्य कॅब चालकांच्या आऊट स्टेशन ट्रीप चोरू नये.

Advertisement

4) ट्रीप दरम्यान ड्रायव्हर लोकांना काही समस्या असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी, इफेक्टिव्ह ऑनलाइन किंवा ऑफलाइन सपोर्ट सिस्टीम / यंत्रणा तयार करावी

5) कोणत्याही ड्रायव्हर वर आयडी ब्लॉक करणे किंवा दंड लावणे यासारख्या कारवाई करण्यापूर्वी पॅसेंजरने केलेल्या तक्रारीची शहानिशा करावी तसेच आयडी ब्लॉक अनब्लॉक करण्यासाठी नेमलेले दलाल शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. खोटी करणे देऊन ID ब्लॉक करू नये

6) पिक अप चार्जेस, वेटींग चार्जेस, पॅसेंजर कॅन्सलेशन चार्जेस, वाईट चार्जेस पूर्वी प्रमाणे व्हावेत.

रिक्षाचालकांचे प्रमुख प्रश्न:

1) प्लॅटफॉर्म फी त्वरित बंद करावी, व मीटर प्रमाणे वेटींग चे पैसे द्यावे.

२) दिवस दिवस थांबून पण ट्रीप वाजत नाही. अॅपवर रिक्षापेक्षा कॅब स्वस्त केल्यामुळे रिक्षाला भाडी भेटत नाहीत व कॅबचालकाना भाडी परवडत नाहीत.

फूड / पार्सल डिलिव्हरी बॉईज चे प्रमुख प्रश्न :

) ऑर्डर चे दर सर्वांना एकसमान करावेत व त्यात कमीत कामी 50% वाढ करावी.

१ 2) डिलिव्हरी बॉईज ला काही अडचण असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी यंत्रणा असावी. टीम लीडर ने नियमित भेट देऊन प्रश्न मार्गी लावावेत.

३) फोन वर दिसणारे अंतर व प्रत्यक्षातील अंतर यात फरक नसावा. तसेच बॉय ला इन्सेंन्टीव मिळू नये म्हणून होणारा शेवटच्या ऑर्डर चा गोलमाल थांबवावा.

4) कोणत्याही डिलिव्हरी बॉयवर आयडी ब्लॉक करणे किंवा दंड लावणे यासारख्या कारवाई करण्यापूर्वी कस्टमर वे केलेल्या तक्रारीची शहानिशा करावी, त्यात हॉटेल ची चूक असेल तर त्याचे खापर बॉय वर फोडू नये. तसेच आयडी ब्लॉक अनब्लॉक करण्यासाठी नेमलेले दलाल शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. खोटी कारणे देऊन ID ब्लॉक करू नये.

5) प्रति दीन किमान कमाई (मिनिमम वेजेस) मिळवून देण्याची सोय असावी व ती मिळाल्यास नुकसान भरपाई द्यावी.

हे व जवळपास अश्याच प्रकारचे इतर काही प्रश्न पोर्टर आणि अर्बन कंपनी सारख्या अॅप्स वर काम करणाऱ्या कामगारांचे सुद्धा आहेत.

यातील जवळपास 90% प्रश्न आपण मागणी करत असलेल्या महाराष्ट्र गिग वर्कर्स अॅक्ट व महाराष्ट्र कॅब अग्रेगेटर नियम आपल्या राज्यात लागू झाल्यास सुटतील. त्याशिवाय आपल्यासाठी इन्शुरन्स व कल्याणकारी मंडळ, पेन्शन, मुलांसाठी स्कॉलरशिप यासारख्या अनेक सुविधांचा उल्लेख सदर कायद्यांमध्ये आहे.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page