आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल संघाने चाटे स्कूल माध्यमिक यांच्यावर तब्बल ५२ धावाने दणदणीत विजय मिळविला
संभाजी चौगुले :
कोल्हापूर : काल दि. 23/10/2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासन संलग्न व कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व कोल्हापूर म.न.पा आयोजित 17 वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामना मध्ये आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल संघाने चाटे स्कूल माध्यमिक यांच्यावर तब्बल ५२ धावाने दणदणीत विजय मिळवून २८ व २९ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेला पात्र झाले.
आयर्विन हायस्कूल कढून राजदीप मंडलिक नील बाटूनगे , किशोर भोसले यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली व संघाची धावसंख्या ७ षटकात ८३ पर्यंत पोहचवली . गोलंदाजी करताना आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करून चाटे स्कूल ला ३१ धावावर रोखले व हा सामना ५२ धावा ने विजय झाले . व त्याच बरोबर काल झालेल्या १७ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या शाळेचे मुलीने शांतिनिकेतन स्कूल ला नमवून तृतीय क्रमांक पटकावला .
आपल्या शाळेकडून श्रेया समृद्धी जान्हवी हंसिका पूर्वा प्रज्ञा या सर्व मुलीं ने उत्कृष्ट कामगिरी केली सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन सर्व खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापिका सौ वर्षा बिजापूरकर मॅडम पर्यवेक्षक देवकर सर क्रीडा शिक्षक पॉल सूर्यवंशी सर राहुल चोपडे सर स्वप्नील वांद्रे सर यांचे मार्गदर्शन लाभले. व त्यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636