उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः


  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण. 

पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे – उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे. 

उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरचे पॅनल  निवडणुकीमध्ये हरलेले आहे म्हणजेच सभासदानी त्यांना नाकारलेले आहे आणि शेखर धोत्रे ज्या पॅनल यामध्ये होते ते पॅनल जिंकलेले आहे तरीही केळकर इतरांना ब्लॅकमेल करून बेकायदेशीर ठराव मंजूर करून घेण्याच्या प्रयत्न्य  करत आहे. 

Advertisement

कर्नल तनेजाने यांनी याबाबतची पूर्ण माहिती श्री शेखर धोत्रे साहेब यांना मैल द्वारे दिली आहे व याचा पूर्ण अभ्यास कर्नल तनेजाने  यांनी केलेला आहे.

एवढ्या मोठ्या प्रकरणाचा अभ्यास करून मार्गदर्शन करण्यासाठी श्री शेखर धोत्रे यांनी आर्कीटेक्ट  / वकील  पाहिजे असा  ठराव महासभेमध्ये मंजूर करून घेतला असतानाही केळकर, बासू आणि त्यांचे इतर साथीदारांनाही तो अंमलात आणला नाही जे अगदी बेकायदेशीर आहे. वेळोवेळी वेगवेगळी करणे देऊन , संपूर्ण FSI बिलडेररच्या घस्यामध्ये घालण्याचा डाव रचला. बासूचे  प्रकरणही तितकेच गंभीर आहे.बिल्डरशी संबंधित 5 कोटींचा  व्यवहाराची उघडपणे त्याने मीटिंग मधेच  कबुली दिली आहे.तसेच बिल्डरविरोधात  दाखल केलेल्या मोफा  केस ची फाईल हि केळकर ने लपवून शेखर धोत्रेंपासून लपवून ठेवली आहे . बासू ने धोत्रे यांना मराठीमध्ये बोलण्यास विरोध केला आणि सोसायटीच्या मीटिंग यामध्ये हिंदी किव्हा इंग्लिश मधेच बोलायचे असे सांगितले, तसेच महाराष्ट्र सरकारचा GR असतानाही मीटिंग चे रेकॉर्डिंग करून दिले नाही , हे सर्व पुरावा नष्ट करण्याचा दृष्टीने केले गेले. महाराष्ट्रामध्ये राहून, मराठी बोलायचे नाही म्हणजे हा दादागिरीचा  प्रकार आहे.  मलाच नाहीतर इतरांना सुद्धा याचा भयंकर त्रास होत आहे पण या जोडगळीला घाबरून कोणीही पुढे तक्रार करण्यास  धजवले नाही.विशेष म्हणजे केळकरने स्वतःच पत्र लिहून सगळ्यांना सांगितले आहे कि माझे बिल्डरबरोबर हितसंबंध आहेत जे त्याने  उपनिबंधकांन पासून पूर्वी लपवून ठेवले होते.  या खुलाशांना प्रत्युत्तर म्हणून उपनिबंधक कार्यालयाने संदिग्धतेला जागा न देणारा निर्देश लागू करून ठोस भूमिका घेतली आहे. त्यामुळे विनायक केळकर आणि राजीव बास  या जोडगोळीला कन्व्हेयन्स डीड बद्दल होणाऱ्या  सोसायटीच्या चर्चा, वाटाघाटी,आतमधील व बाहेरील  बैठकांपासून दूर ठेवले पाहिजे. या निर्देशाचे पालन करण्याची जबाबदारी न्याती भव्य सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांवर आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सहकारी १९६० कायद्याअंतर्गत येणाऱ्या  ११९ या पोटाकल्माचा सखोल अभ्यास करून श्री शेखर धोत्रे (व्यवस्थापन समितीचे सदस्य) यांनी उपनिबंधकांनकडे तक्रार दाखल केली होती. प्रकरण ५० कोटिच्या  वरचे असून शेखर धोत्रेन वरती दबाव आण्यासाठी केळकर ने खोट्या पोलीस तक्रारा दाखल केल्या होत्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

शेखर धोत्रेंनी आर्थिक गुन्हे  अन्वेषण विभागाकडे केळकर आणि त्याला साथ देणाऱ्यानबद्दल  या बेकायदेशीर कृत्यांची रीतसर तक्रार   दाखल केली आहे व CBI विश्रांतवाडी कार्यालयाची संपर्कात आहेत.   पुढील  तपास  चालू  आहे , जशी नवीन माहिती उपलब्द होईल तसे आम्ही वेळोवेळी तुम्हाला  अपडेट देत राहू. शेखर धोत्रे ना प्रसिद्ध फ़ौजदारी वकील श्री विजयसिंग ठोंबरे पाटील व  सहकार संबंधित कामा मध्ये विजय सुपेकर मार्गदर्शन करत आहेत. शेखर धोत्रेंच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक होत आहे , व याचा फायदा इतर सोसायटनपण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

ह्या सर्व केसची धोत्रेंनी माहितीच्या अधिकारखाली सर्व माहिती मागवून केळकरचा पोलखोल केली आहे.

बिल्डरने बेकायदेशीर रित्या सोसायटीच्या जागेचा नकाशा महासभेची मंजुरी न घेताच बदललेला आहे व इथे हॉस्पिटल बांधण्याचा प्लॅन आहे जो अगदी बेकायदेशीर रित्या करण्यात आला आहे – तो पण रद्द करावंया असेपण आदेश देण्यात आले आहेत. या बद्दल पुणे महापालिकेलापण (सिटी इंजिनेर वाघमारे यांनापण ) पत्र पाठविण्यात आले आहे. 

– शेखर धोत्रे . पुणे 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page