कळस येथील स्मशानभूमी दुरुस्त करा – आप ची मागणी


अनेक दिवसांपासून कळस गावातील स्मशानभूमी मधील दहन करणाऱ्या जागेवरची जाळी तुटली आहे , यामुळे याठिकाणी अंत्यसंस्कार करता येत नाही.
या जागेवर लाकडे रचता येत नाहीत , अनेकदा मयत शरीर खाली घसरते. मागील महिन्यात याबाबत सविस्तर निवेदन देऊनही अजून पर्यंत या ठिकाणाची दुरुस्ती झालेली नाही .

Advertisement

कळस स्मशान भूमी मधे मद्यपी, व्यसनी लोकांनी अड्डा करून ठेवला आहे. येथील रूमचे दरवाजे तोडून ते आत बसतात. कोणताही पालिकेचा सुरक्षा रक्षक याठिकाणी रात्री नसतो. येथील सीसीटीवी ही बंद अवस्थेत आहेत. पोलीस विभागाने सुद्धा यावर वेळोवेळी दस्त घालणे गरजेचे आहे. कळस येरवडा शेत्रिय कार्यालयात मोहल्ला मीटिंग मधे यावेळी आम आदमी पार्टी चे युवा आघाडीचे शहर अध्यक्ष अमित म्हस्के यांनी याबाबत प्रश्न विचारले, लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास आम आदमी पार्टी च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page