कोल्हापुरात मोठ्या उत्साहात शाही दसरा सोहळा पार पडला.
मुरलीधर कांबळे
कोल्हापूर- ऐतिहासिक दसरा चौकात मोठ्या थाटात शाही दसरा सोहळा पार पडला.या वर्षी राज्यशासनाने या दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने या सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे.आई अंबाबाई,आई तुळजाभवानी आणि गुरुमहाजांच्या पालखीचे भव्य मिरवणूकीने आगमन झाले.यात शाही लवाजम्यासह हत्ती,घोड्यासह सहभागी झाले होते.
राजवाड्यावरुन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,युवराज संभाजीराजे,युवराज मालोजीराजे ,यशराजे आणि शहाजीराजे यांचे मेब्यक कार मधून आगमन होऊन त्यांना पोलिसांनी मानवंदना दिली.त्यानंतर राजपुरोहितांच्या हस्ते पुश्पाजंली वाहुन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीचे पूजन करून राजघराण्यातील सदस्यांनी सोने लूटले त्या नंतर हवेत बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्यानंतर ऊपस्थितांनी धाव घेऊन सोने लुटण्यात येऊन “सोने घ्या सोन्या सारखे रहा “अशा शुभेच्छा एकमेकांना देण्यात आल्या .
यासोहळ्यास पालकमंत्री मा. हसन मुश्रीफसो ,चंद्रकांतदादा पाटील,मा.प्रतापसिंह जाधव,पो.अधीक्षक मा.महेंद्र पंडीतसो ,कोल्हापुरच्या आयुक्त डॉ.के.मंजुलक्ष्मी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.त्यानंतर सर्व पालख्यां लवाजम्यासह सिध्दार्थनगर मार्गे रवाना झाल्या.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636