कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्य. शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रविंद्र मोरे तर उपाध्यक्षपदी रघुनाथ कांबळे यांची निवड .
विशेष प्रतिनिधी: संभाजी चौगुले :
कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्य. शिक्षक व सेवक पतसंस्था मर्या. कोल्हापूर या पतसंस्थेच्या नूतन अध्यक्षपदी रविंद्र यशवंत मोरे यांची तर उपाध्यक्षपदी रघुनाथ बाबूराव कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सदरची निवड कोल्हापूर जिल्ह्याचे सहाय्यक उपनिबंधक के. एस. ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी पतसंस्थेचे मावळते अध्यक्ष रघुनाथ मांडरे यांनी संस्थेच्या कामाचा थोडक्यात आढावा घेवून भावी काळामध्ये नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी संस्थेसाठी झोकून देवून काम करण्याच्या साठी शुभेच्छा दिल्या.
सदरच्या निवडीप्रसंगी प्रथम मावळते अध्यक्ष यांनी प्रास्ताविक केल्यानंतर संस्थेचे जेष्ठ संचालक प्रकाश पोवार यांनी अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांच्या नावाची घोषणा केलेनंतर संचालक दिलीप वायदंडे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी रघुनाथ कांबळे यांच्या नावाची घोषणा योगेश वराळे यांनी केलेनंतर संचालक संजय कांबळे यांनी अनुमोदन दिले.
याप्रसंगी नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी भविष्यात संस्थेच्या प्रगतीसाठी योग्य निर्णय घेतले जातील आणि सर्वांना योग्य न्याय देण्याचे आश्वासित केले. सदरच्या निवडीसाठी माजी अध्यक्ष रघुनाथ मांडरे, उपाध्यक्ष विकास, कांबळे, समिती सदस्य राहूल माणगांवकर, जेष्ठ संचालक प्रकाश पोवार, नंदकुमार कांबळे, दिलीप वायदंडे, संजय कांबळे, योगेश वराळे, बापू कांबळे, दत्तात्रय टिपुगडे, विलास दुर्गाडे, सुजाता भास्कर, सुजाता देसाई, तज्ञ संचालक अण्णा पाटील, व्यवस्थापक बाबूराव साळोखे. तसेच अभिनंदन करण्यासाठी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार नूतन उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी मानले
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636