कोल्हापूर जिल्ह्यात कामगार कल्याण अधिनियम १९५३ ची अंमलबजावणी होणेसाठी प्रयलशील विभागीय आयुक्त मनोज पाटील
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार, कापड दुकाने / हॉटेल्स / औषधी दुकाने / लहान दवाखाने / पतसंस्था / सोसायट्या / मॉल्स / माल वाहतुक संस्था अशा विविध ठिकाणी ५ पेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत. मात्र संबंधित आस्थापना तसेच सदर संस्थांच्या व्यवस्थापनाकडून कांही अपरिहार्य कारणामुळे त्यांच्या कामगारांचा कामगार कल्याण निधी शासनाकडे जमा केला जात नाही.
यासाठी संबंधित आस्थापना व संस्थांना प्रत्यक्ष भेटून तसेच त्यांना मंडळाचे कार्य, ध्येय, धोरण व उद्देष्टांची योग्य ती माहिती, विविध माध्यमांच्याच्याद्वारे देवून संबंधित कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना व उपक्रमांचा लाभ मिळावा म्हणून संबंधित व्यवस्थापकांनी कामगार कल्याण निधी भरावा यासाठी, संबंधित सर्व संस्थांची सातत्याने भेट घेवून आवाहन करणार असलेचे मंडळाचे पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी आज कोल्हापूर येथे शिष्टमंडळाला सांगितले. ज्यायोगे या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार, कामगार कुटुंबीय व त्याची पाल्ये यांना यापुढील काळात शासनाच्या योजना व उपक्रमांचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील असंघटीत कामगारांना मंडळाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ मिळावा, यासाठी मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना मार्गदर्शनाखाली पुणे विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्वरीतच सहा. कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेली भेट ही जिल्ह्यातील असंघटीत कामगारांच्या आशा पल्लवीत करणारी आहे.
राज्यातील सर्व असंघटीत कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा व उपक्रमांचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने असोसिएशनच्या माध्यमातून अभ्यासू पाठपुरावा सुरू आहे. यावेळी जिल्ह्यातील संघटीत व असंघटीत कामगारांना इतर जिल्हयाप्रमाणे विविध उपक्रमांचा सुद्धा लाभ मिळावा, यासाठी शिष्टमंडळाच्यावतीने सकारात्मक चर्चा करणेत आल्या. यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे यासंबंधी पत्रव्यवहार करणेत येईल, असेही मनोज पाटील यांनी सांगितले.
सदर भेटीच्या वेळी सुरुवातीला विभागीय सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांचे पुष्प गुच्छ व पुस्तक देवून उपस्थित सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे तसेच सर्व संचालक व स्टाफ उपस्थित होते. तसेच शिष्टमंडळामध्ये राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, मेडीकल असोसिएशनचे श्रीकांत माजगावकर, चंद्रकांत वडर, भगवान माने, सुभाष पाटील, महादेव चक्के, अनिता काळे, संजय सासणे, संभाजी थोरात, बाळासाहेब कांबळे आदी. मान्यवर उपस्थित होते, असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी सांगितले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636