दारुच्या नशेत कार चालवून युवकाच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या चालकास पोलिस कोठडी
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-दारुच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून काही वाहनाना धडक दिली होती.या धडकेत एक युवक जागीच ठार झाला होता.आणि काही जण जखमी झाले होते.या युवकाच्या मृत्युस जबाबदार धरुन कार चालक ऋषीकेश बाबूराव कोतेकर (29रा.शिवाजी पेठ) याला शाहुपुरी पोलिसांनी अटक केली होती.त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अपघातातील मोटार कार झेडपीतील चंद्रकांत पाटील नावाच्या कर्मचारयाची असून त्याने भाडेत्तत्वावर जीएसटी विभागाला दिली असल्याचे समजले.
या अपघातात वरुण रवि कोरडे (22 रा.महावीर कॉलेज जवळ)हा दुचाकी स्वार ठार झाला होता आणि चौघे जखमी झाले होते.या कारचा चालक कोतेकर याच्या विरोधात पोलिसांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636