नारायण देवी चॅरिटेबल संस्थेच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ संपन्न
गुणवंत शिक्षक व कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित
पुणे न्यूज एक्सप्रेस :
अन्वरअली शेख
देहूरोड शहर दि.19 शहरातील प्रख्यातसंस्था नारायण देवी चारिटेबल ट्रस्ट व ईश्वर अग्रवाल यांनी शिक्षक दिनानिमित्त अवचित साधून आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक व कर्मचारी पुरस्कार समारंभ आयोजित केले होते, या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होते,
यावेळी संस्थेचे संस्थापक ईश्वर अगरवाल म्हणाले नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेल्या 38 वर्षापासून मानव हिताचे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवित आहे, आणि या सर्व उपक्रमात माझे सहकारी विशेष दीपक चौगुले आणि इतर सर्व सहकारी माझ्या सोबत आहेत, संस्थेने करोना काळात विविध प्रकारच्या सेवा गरजू लोकांपर्यंत पोहोचविल्या त्यावेळी प्रत्येक जण आपला जीव जपत होते अशा संकट काळात नारायण देवी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सहकारी रस्त्यावर उतरून भुकेलेल्या लोकांना अन्न वाटप करून गोरगरिबांची सेवा केली तसेच करोना मधे मृत पावलेल्या 22 मृतदेहाचे अंत्यविधी संस्कार संस्थेने केले. मानवतेच्या उद्देशातून शिक्षक दिनानिमित्त आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनी घ्यायचा होता पण पावसाच्या व्यत्य मुळे घेता आलेले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि तो सन्मान आत्ता घेऊन संस्थेच्या वतीने देहुरोड शहर परिसरातील शिक्षकांचा व कर्मचारी यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे ,असेच संस्थेच्या मानवतावादी उपक्रमांना सहकार्य करत रहा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांनी यावेळी केले .
अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांच्या नावातच ईश्वर आहे त्या ईश्वर रूपातून ते समाज हिताचे स्तुत्य उपक्रम राबवीत आहेत देहूरोड शहरात पहिल्यांदा आम्हा शिक्षकांचा सन्मानाचा गौरव समारंभ घेऊन शिक्षकांचा गौरव केला त्याचबरोबर त्यांना आम्ही शिक्षकांच्या वतीने सदस्य धन्यवाद देतो असे प्रतिपादन देहूरोड रिपब्लिकन शाळेच्या मुख्याध्यापिका सविता आरेकर यांनी केले.
या वेळी रामदास ताटे, श्रीमंत शिवशरण, मोझेस दास, मलिक शेख विशाल संविधान चे संपादक सुरेश सोनवणे,, दै. राज स्तंभ चे संपादक बापु जाधव, ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर, ह्युमन राईट्स फाॅर प्राॅटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी, आर टी आय कार्यकर्ते पोपटराव कुरणे, माजी नगरसेवक के सी बिडलान, ह्युमन राईट्स जस्टीस चे पुणे जिल्हा सेक्रेटरी चंद्रशेखर पात्रे, सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड, महिला नेत्या राजश्री राऊत, धनश्री दिंडे, सोनी रामनानी आदि उपस्थित होते, या कार्यक्रमाचे संयोजन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार नेते दिपक चौगुले, सुभाष चंडालिया, राकेश वाल्मिकी, इंद्रपाल रित्तु यांनी परिश्रम घेतले.
*कार्यक्षम अधिकारी पुरस्कार*
1) आमितकुमार माने साहेब,
(मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड कॅटॉन्मेंट बोर्ड पुणे)
2) दिगंबर सूर्यवंशी साहेब,
(पोलिस निरक्षक, देहूरोड पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय पुणे)
*आदर्श शाळा व आदर्श शिक्षक वर्ग पुरस्कार*
मुख्याध्यापिका सविता आर उत्तेकर मॅडम
(लायन्स क्लब एज्युकेशन असोसिएशन इंग्लिश मीडियम स्कूल देहूरोड पुणे)
मुख्याध्यापिका रेणुकादेवी करोनाथ प्रशासक
(सेंट जॉर्ज इंग्लिश मीडियम स्कूल मामुडी देहूरोड पुणे)
मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप
(साऊथ इंडियन असोसिएशन विजडम इंग्लिश मीडियम हायस्कूल विकास नगर देहूरोड पुणे)
मुख्याध्यापक प्रभुदास जमांगली (महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल, एम.बी. कॅम्प, देहूरोड, पुणे-)
मुख्याध्यापक
(डी.वाय. पाटील कॉलेज, फार्मसी विभाग, आयुन्नुईी,)
मुख्याध्यापिका – प्रतिभा सुरेंद्र विसपुते
(पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्राथमिक शाळा, कै. मल्हारराव विठोबा तरस प्राथमिक
विकास नगर, किवळे, देहूरोड,
मुख्याध्यापिका – रंजना महेंद्र संपकाळे
(पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, श्री शिवाजी विद्यालय मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, देहूरोड,पुणे)
मुख्याध्यापिका – धनश्री संतोष जाधव( श्री शिवाजी प्राथमिक शाळा, देहूरोड, पुणे)
मुख्याध्यापिका आशा बाळासाहेब भद्रे
(महात्मा गांधी हायस्कूल, एम.बी. कॅम्प, देहूरोड, पुणे )
मुख्याध्यापिका – सुरेखा प्रवीण वायकर
(स्वामी विवेकानंद प्राथमिक मराठी शाळा, शेलारवाडी,)
(शाळा स्थळ :- एम.बी. कॅम्प, देहूरोड, पुणे)
मुख्याध्यापिका – संयुकता आरेकर
(सॅमसंन मेमोरियल रिपब्लिक स्कूल, देहूरोड, पुणे)
अंगणवाडी शिक्षिका कोमल प्रकाश साबळे
(पारशी चाळ, अंगणवाडी, देहूरोड, पुणे)
अध्यक्ष – अग्रेसेन महाराज युवक संघ देहूरोड येथील
मा.मुख्याध्यापिका. वंदना शरद (कुमार महाला गांधी हिंदी प्राथमिक शाळा M.B. कॅम्प देहूरोड)
मुख्याध्यापक संजय महादेव तापलीर. महात्मा गांधी प्राथमिक शाळा एमबी फामा देहूरोड