पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात १००० महिलांनी केले सामूहिक विष्णू सहस्रनाम आणि श्री सुक्तठण
पुणे : नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात सामूहिक श्री विष्णू सहस्रनाम आणि श्री सुक्तपठण याचे १००० हून अधिक महिलांनी सामुहिक पठण केले. यावेळी सर्व महिलांनी श्री. विष्णू सहस्रनाम पठणवेळी श्री विष्णू मूर्तीला तुळस वाहून वंदन केले. तसेच श्री सुक्तपठण वेळी श्री लक्ष्मीचा मूर्तीस कुंकू अर्पण केले. सर्व महिलांनी ५ वेळा विष्णू सहस्रनाम पठण आणि ७ वेळा श्री सुक्तपठण केले. फुलांनी सजवलेल्या श्री लक्ष्मीमाता मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिराचं परिसरात धूप आणि उदबत्ती यांचा सुहासिक वास येत होता. सारे वातावरण मंगलमय झाले होते. त्यानंतर देवीची सामूहिक आरती करण्यात आली.
याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, सुजाता शहा, छाया चरवड व सौ. किराड उपस्थित होत्या. गजानन महारज ग्रुपच्या विद्याताई डोंबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहभागी सर्व महिलांची ओटी भरण्यात आली व लाडू चिवड्याचा फराळ व आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.
याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले की, नवरात्रौ हा नारीशक्तीचा उत्सव आहे. तसेच आपल्या धार्मिक परंपरा आणि श्रद्धा यांचाही हा उत्सव आहे. महिलांच्या अशा एकत्र येण्यामुळे महिलांही संघठीत होतात, हे महत्वाचे मानले पाहिजे. पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी सर्वांचे आभार मानून म्हंटले कि, विष्णू सहस्रनाम आणि श्री सुक्तपठणामुळे मनाला मोठा आनंद तर मिळतोच, शिवाय आधारही मिळतो तसे पुढील पिढी पर्यंत हे धार्मिक संस्कार जाण्याची मदत होते. हर्षदा बागुल आणि श्रुतिका बागुल यांनी यांनी सूत्रसंचालन केले दीपा बागुल यांनी आभार मानले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636