भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ मार्गदर्शक एस एन देशपांडे यांचे दुःखद निधन
पुणे : भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ते श्री शशिकांत नारायण उर्फ एस. एन. देशपांडे (वय 82 ) यांचे 27 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे येथे दुःखद निधन झाले.
.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामधून निवृत्त झालेले एस एन हे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे संस्थापक सदस्य होते. संघटना वाढवण्यात आणि वीज उद्योगात अग्रस्थानी आणण्यात, देशभरातील वीज ऊद्योगातील कामगारांच्या प्रश्नांवर आंदोलने, चळवळी करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते, भारतीय मजदूर संघ वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटत होता.वीज कामगार महासंघ बरोबरच भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशातही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या पार पाडल्या.
प्रदेश उपाध्यक्ष, संघटन मंत्री त्यानंतर भारतीय मजदूर संघ केंद्रीय उपाध्यक्ष, क्षेत्रीय प्रभारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाड पाडल्या होत्या. अनेक वर्ष भारतीय श्रमशोध मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. मजदूर संघाच्या विचारांची उत्तम जाण असणारे कार्यकर्ते, उत्तम वक्ते, मृदू व प्रेमळ स्वभाव हे त्यांचे गुण. अनेक वर्ष डायबिटीस असतानाही इंजेक्शन घेऊन त्यांनी देशभर प्रवास केला.
आजार पणातही ते मजदूर संघाच्याच कामाचा विचार करत असत. “कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती ” ही उक्ती त्यांना तंतोतंत लागू पडली. त्यांच्या जाण्याने मजदूर संघाचा आधारवड हरपला . अशी भावना कार्यकर्तानी व्यक्त केली आहे.
अत्यंविधी वैकुंठ स्मशानभूमीत दि 28 आक्टोबर रोजी सकाळी 9 वा होणार आहे. त्या पुर्वी सकाळी 8 वा भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा कार्यालय विश्वकर्मा भवन 185 शनिवार पेठ पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636