महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज सोमवार दि.१८सप्टेंबर रोजी शहरातील सांगली रोड नजीकच्या कचरा डेपो आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह संपूर्ण परिसराची पाहणी केली.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे आणि कंपनीचे प्रतिनिधी यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, लिचड ट्रीटमेंट केंद्र आणि बायोमिथेनेशन केंद्रा बाबतची सविस्तर माहिती दिली.
स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे सर्व प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वच प्रकल्प पुर्ण क्षमतेने आणि गुणवत्तापुर्वक रित्या सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्त यांनी आरोग्य अधिकारी यांना दिल्या. तसेच त्याठिकाणी अद्यापही कार्यान्वित न झालेले लिचड ट्रीटमेंट केंद्र तातडीने सुरू करणेचे आदेश संबंधित कंपनी च्या प्रतिनिधींना दिले.
यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे यांचेसह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.