माईच्या विद्यार्थ्यांनी घेतली सैनिक रविकिरण गोंगाणे यांची मुलाखत
इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील माई महिला मंडळ एस संचलित माई बाल विद्या मंदिरात दप्तराविना शाळा या उपक्रमांतर्गत सैनिकाची मुलाखत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन आर्मीचे इंजिनिअर रविकिरण गोंगाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यासपिठावर माई बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ .शैला कांबरे ,ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रतिभा कोळी,सौ.रजनी घोडके ,सौ. सुरेखा वरुटे उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शैला कांबरे यांनी केले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.रजनी घोडके यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.मुख्याध्यापिका सौ. शैला कांबरे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे भारतीय सैनिक रविकिरण गोंगाणे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी मुलाखतीसाठी शाळेत बोलवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हा आपल्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले .
रक्षाबंधन निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी सैनिकांना राख्या पाठविल्याबद्दल सर्व मुलांचे मनापासून कौतुक केले. यानंतर चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे रविकिरण गोंगाणे यांना नाव, शिक्षण ,आवड , छंद,कुटुंब,देशाच्या सीमेवर सेवा बजावत असताना आलेले अनुभव याविषयी प्रश्न विचारून सविस्तर मुलाखत घेतली.मुलाखतीतून त्यांनी
सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण ,स्वावलंबन, शिस्त, आहार, नियमित व्यायाम याकडे लक्ष द्यावे व आपल्या मनामध्ये राष्ट्रप्रेम बाळगून तो जोपासण्यासाठी प्रयत्नशील रहावे ,असा संदेश त्यांनी दिला. यानंतर चौथीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भारताच्या नकाशाच्या आकारात उभे राहून आपल्या देशाला व सर्व सैनिकांना मानवंदना दिली.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ.मीना तोसनीवाल ,सेक्रेटरी निकिता शहा यांचे प्रोत्साहन लाभले.यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा कोळी यांनी केले. तर आभार सौ .उज्वला कोठावळे यांनी मानले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636