मिरज लक्ष्मी मार्केट येथे या ही वर्षी होलार समाज समन्वय समितीच्या वतीने नवरात्रीच्या निमित्ताने भव्य स्वागत कमान उभारण्यात आली……..
मिरज प्रतिनिधी धनंजय हलकर शिंदे
मिरज : शनिवार दि,21/10/2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री मा.सुरेशभाऊ खाडे साहेब यांच्या हस्ते फित कापुन व शिवसेना मिरज शहर उपप्रमुख किरण कांबळे होलार समाजाचे जेष्ठ नेते अभिमन्यू मासाळ भाजपचे शशिकांत वाघमोडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वागत कमानीचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे होलार समाजाचे जेष्ठ नेते अभिमन्यू मासाळ साहेब,शिवसेना मिरज शहर उपप्रमुख किरण कांबळे,भाजपा चे शशिकांत वाघमोडे,प्रतिक पाटील,होलार समाज समन्वय समिती मिरज शहर युवा अध्यक्ष सुनील केंगार,राजाराम हात्तेकर,दत्ता हात्तेकर,अभिषेक गेजगे,अजय हात्तेकर,अनुराज ढोबळे,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636