वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार
वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार
पुणे न्यूज एक्सप्रेस : अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर या मंडळाचे गणेश विसर्जन वेळी अतिग्रे येथील नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या महिलांनी पारंपारिक पद्धतीने लेझीम कला सादर केली लेझीम पथकामध्ये गणेशाचे विसर्जन मोठ्या आनंदाने उत्साहाने आपली कला महिलांनी सादर केली .
शाहूनगर जयसिंगपूर या भागामध्ये सर्व नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात कौतुक केले महिलांनी वक्रतुंड युवक मंडळामध्ये जी कला सादर केली यामध्ये त्यांना अध्यक्ष वाहतूक सेना श्री अण्णासो चव्हाण यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले अतिग्रे तालुका हातकणंगले नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातील महिलांनी विना मोबदला गणेश विसर्जनासाठी जयसिंगपूर येथे जाऊन आपली पारंपरिक लेझीम कला सादर केली मंडळामार्फत अतिग्रे ग्रामपंचायत विद्यमान सदस्या सौ दिपाली पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी मंडळाचे अध्यक्ष असद मुल्ला यांनी आमच्या मंडळातील गणेश विसर्जनासाठी आलेल्या अतिग्रे येथील नवदीप तरुण मंडळातील सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला या महिलांना लेझीम पथकासाठी प्रशिक्षक म्हणून धनाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले व हलगी वादक प्रकाश पाटील ,भगवान पाटील, यांनी केली यावेळी उपस्थित वक्रतुंड युवक मंडळ अध्यक्ष ,उपाध्यक्ष, व सर्व सदस्य शाहूनगर जयसिंगपूर येथील सर्व नागरिक उपस्थित होते