विजय तातोबा पाटील यांचा अमरण उपोषणाचा इशारा सांगोला तहसीलदार यांना निवेदन
पुणे न्यूज एक्सप्रेस :
अन्वरअली शेख
सोलापूर जिल्हा येथील विजय तातोबा पाटील, रा. अचकडाणी, ता. सांगोला,यांनी अमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे, महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजास ST आरक्षणाचे दाखले व मराठा समाजास OBC आरक्षणाचे दाखले मिळणेसाठी दि. 27/10/2023 पासुन मौजे अचकदानी येथील हनुमान मंदीरामध्ये बेमुदत अमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे याची माहिती विजय तातोबा पाटील, रा. अचकडाणी, ता. सांगोला, जि. सोलापूर यांनी पुणे न्यूज एक्सप्रेसया वृत्त वाहिनीला पत्रकाद्वारे दिली आहे
विजय तातोबा पाटील यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी वरील ठिकाणचा रहिवासी असून महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजास STआरक्षणाचे दाखले व मराठा समाजास OBC आरक्षणाचे दाखले मिळणेसाठी दि. 27/10/2023 पासुन मौजे अचकदानी येथील हनुमान मंदीरामध्ये बेमुदत अमरण उपोषण करणार असून माझ्या जीवीतास काही धोका निर्माण झाल्यास महाराष्ट्र राज्यातील सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.असे अर्ज सांगोला तालुक्यातील तहसीलदार यांना सादर केले आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636