विभागीय जलतरण स्पर्धेत हेरवाड हायस्कूलचा विद्यार्थी सिद्धांत भोसले याचे यश
कुरुंदवाड / प्रतिनिधी हेरवाड हायस्कूलचा विद्यार्थी सिद्धांत भोसले याने इचलकरंजी येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत चांगले यश संपादन केले. त्याने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक,२०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक तर १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
त्याने केलेल्या अथक परिश्रमामुळेच त्याने हे यश संपादन केले आहे. यासाठी त्याला त्याचे पालक पांडुरंग भोसले यांनी परिस्थिती नसतानाही एक उत्तुंग ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलाकडून दररोज सराव करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली.
यासाठी त्याला मार्गदर्शक बी.पी. भोसले व शंकराव पुजारी , आय.एम.सी.क्लब इचलकरंजीचे प्रशिक्षक जी.पी.बर्गे यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा.आ.पाटील, सचिव अजित पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर कनवाडकर,
सर्व संचालक , क्रीडाशिक्षक अजित दिवटे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल हेरवाड हायस्कूलच्या वतीने त्याचे अभिनंदन करुन त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636