संविधान ग्रुप’ महाराष्ट्रच्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा
पुणे : संविधान ग्रुप ,महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राकेश सोनवणे, सचिन गजरमल, मुदस्सर शेख,मारुती मांडेकर,सागर जगताप,सागर आढागळे इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी गौतम बुद्धाला अभिप्रेत मानवी मुल्यांसाठी कार्यरत राहण्याची शपथ घेण्यात आली.
विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध यांना अभिप्रेत असलेला बौद्ध धर्म भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दिवशी स्वीकारला तो दिवस धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी बुद्ध वंदना केली जाते तसेच डॉ.आंबेडकर यांनाही अभिवादन केले जाते .
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636