समाजवादी प्रबोधिनीची सेहेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
इचलकरंजी ता.२८ ‘वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन सातत्यपूर्ण काम करणाऱ्या समाजवादी प्रबोधिनीची वाटचाल आता सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या दिशेने होत आहे. प्रबोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून आजच्या काळात भारतीय संस्कृती सह भारतीय राज्यघटनेपर्यंतच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याची मोठी गरज आहे. समाजवादी प्रबोधिनी गेली ४६ वर्षे हजारो कार्यक्रमांच्या आणि शेकडो पुस्तिकांच्या माध्यमातून ते काम करत आलेली आहे. यापुढेही हे प्रबोधनाचे काम अधिक जोमदारपणे करत राहील.
आगामी चार वर्षांत सुवर्ण महोत्सवावेळी समाजवादी प्रबोधिनी सर्वार्थाने बलशाली होईल असे नियोजन केले जाईल त्याचा जनतेने साथ द्यावी असे मत ज्येष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ.अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केला .ते समाजवादी प्रबोधिनीच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते. समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक केले. या सभेत प्रा.डॉ. भारती पाटील,प्रा.डॉ.भालबा विभुते, प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील, डॉ.चिदानंद आवळेकर,प्राचार्या डॉ. त्रिशला कदम,बी.एस. खामकर आदींनी मनोगते व्यक्त केली.
या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांची सविस्तर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच सर्व पदाधिकारी आणि शाखांच्या प्रतिनिधी आपली मनोगत व्यक्त केली. ३१ हजारावर पुस्तके आणि शंभरावर नियतकालिकांनी समृद्ध असलेल्या प्रबोधन वाचनालया पासून गेली ३५ वर्षे नियमित प्रकाशित होत असलेल्या प्रबोधन प्रकाशन ज्योती या मासिका पर्यंतचे सर्व उपक्रम अधिक गतिशील करण्यासाठी अधिक सक्रियतेने सामूहिकरीत्या कार्यरत राहण्याचे ठरवण्यात आले.
या सभेस शशांक बावचकर, प्राचार्य आनंद मेणसे, राहूल खंजिरे अन्वर पटेल, दशरथ पारेकर, प्रा. डॉ. भालबा विभुते ,प्रा.डॉ.संजय साठे, रवी जाधव, सौदामिनी कुलकर्णी, प्राचार्या डॉ .त्रिशला कदम , प्रा. संगीता पाटील नंदा हालभावी,के. एस. दानवाडे, एफ.वाय.कुंभोजकर, ए.एस. पाटील,अशोक शिरगुप्पे, बबन बारदेसकर, ऍड.संभाजीराव जाधव, परशुराम कुंडले, शिवाजी दुर्गांडे दयानंद लिपारे, किर्तिकुमार दोशी, संदीप मुतगेकर , शिवाजी रुमाले,सचिन पाटोळे, देवदत्त कुंभार,शकील मुल्ला,शिवाजी शिंदे, नौशाद शेडबाळे,सतीश कांबळे, प्रा .अप्पासाहेब कमलाकर , प्राचार्य साताप्पा कांबळे,बशीर बाणदार,सिकंदर जमादार, महावीर व्हसाळे, यांच्यासह कोल्हापूर ,सांगली ,सातारा ,बेळगाव आदी जिल्ह्यातील प्रबोधिनीचे सक्रिय कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील यांनी आभार मानले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636