सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ या आगामी मालिकेत महेश ठाकूर साकारणार जयदेव शर्मा या प्रेमळ पित्याची भूमिका
मुंबई: सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ या आगामी मालिकेत एका अशा मुलीची गोष्ट आहे, जी आपल्या वडिलांची जबाबदारी शेवटपर्यंत सांभाळण्यास तत्पर आहे. ही आधुनिक काळातील कौटुंबिक मालिका आहे, ज्यात लग्नाविषयीचा अगदी वेगळा दृष्टिकोन असलेल्या एका मुलीची हृदयस्पर्शी गोष्ट आहे.
या मालिकेत ज्येष्ठ अभिनेता महेश ठाकूर जयदेव शर्मा ही भूमिका साकारत आहे, जो एक प्रेमळ पिता आहे. आपल्या पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर त्याने एकट्याने आपल्या तीन मुलींचा सांभाळ केला आहे. जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. एक पिता आणि त्याची मुलगी पल्लवी (आयुषी खुराना) यांच्यातील सुंदर नात्यावर प्रकाश टाकणारी आंगन ही मालिका प्रेम आणि जबाबदारी यांची गोष्ट आहे. शिवाय त्यात पल्लवीचा लग्नाबाबतचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे.
जयदेव शर्माची भूमिका करत असलेला महेश ठाकूर म्हणतो, “एक कलाकार म्हणून सोनी सबया वाहिनीसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे, कारण या वाहिनीवर पुरोगामी विषय असलेला उत्तम कंटेंट सादर होत असतो. ‘आंगन – अपनों का’ मालिकेची पटकथा पहिल्यांदा वाचली, तेव्हाच मला जयदेव हे व्यक्तिमत्व खूप आवडले होते. त्याचा नौदलातील सेवेचा काळ, पत्नीच्या अकाली मृत्यूचा आघात, तिन्ही मुलींचे त्याने एकट्याने केलेले संगोपन यामधून एका सिंगल पेरेंटची अदम्य ताकद दिसते. आपल्या मुलींशी असलेले त्याचे नाते त्याच्यासाठी सर्वस्व आहे. जयदेव आणि त्याच्या मुलींमधले हे नाते कधी प्रेक्षकांपुढे उलगडते याची उत्सुकता मला आहे.”
सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ बद्दलचे अधिक अपडेट्स मिळवा, येथेच- ही मालिका लवकरच तुमच्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर येत आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636