भंगार गोळा करणाऱ्या महिले कडुन 10 तोळे वजनाचा सापडलेला सोन्याचा राणी हार प्रामाणिकपणे परत.


पुणे न्यूज एक्सप्रेस 

मुरलीधर कांबळे :

कराड – कराड तालुक्यातील गोट गावचे रहीवाशी अधिकराव दिनकर पवार हे शनिवार (दि.07) रोजी आपल्या कुटुंबासमवेत हरतालिका मुर्ती विसर्जन करण्यासाठी कराड येथील प्रितीसंगम घाटावर गेले असता हरतालिका मुर्ती विसर्जन करीत असताना 8,30,000/- रु.किंमतीचा अंदाजे 10 तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार त्यांचेकडुन चुकून विसर्जन झाला होता. सदरचा राणीहार प्रितीसंगम घाट येथे भंगार गोळा करणा-या महीला नुरजहाँ फकीर (रा.शिवाजी स्टेडीयमजवळ कराड ) यांना बुधवार दिनांक 11/09/2024 रोजी सापडला होता. त्यानंतर नुरजहाँ फकीर यांनी सदरचा सोन्याचा राणीहार आपल्या ओळखीचे असलेल्या सराफ व्यापारी सुपर ज्वेलर्स चे मालक निसार सय्यद यांचेकडे आणुन दिला व त्यानंतर निसार सय्यद यांनी ही घटना माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांना या बाबतची माहिती दिली असता निसार सय्यद व सिद्धार्थ थोरवडे यांनी त्या महिलेस तो हार तुम्हाला पाहिजे का असे विचारले असता सदर महिलेने तो ज्यांचा असेल त्यांना द्यावा .असे प्रामाणिकपणे सांगितले.त्यानंतर श्री सिद्धार्थ थोरवडे, निसार सय्यद त्या महिलेसोबत येऊन सदरचा 10 तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार कराड शहर पोलीस स्टेशन मध्ये हजर करून घडलेली माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी अधिकराव दिनकर पवार यांना बोलावुन घेवुन खात्री करून सदरचा सोन्याचा राणी हार ओळख पटवुन त्यांचे ताब्यात दिला . तसेच नुरजहाँ फकीर (रा.शिवाजी स्टेडीयमजवळ कराड ) यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना 10000/- रु.रोख रक्कम व सोबत असणाऱ्या महीलांना साडी देवुन यथोचित सत्कार करण्यात आला.

Advertisement

या महिलेस दुकानात आल्यानंतर सदर हार सोन्याचा आहे हे महिलेला सांगितले व ही बाब पोलिसांना सुद्धा प्रामाणिकपणे कळवल्याबद्दल सुपर ज्वेलर्सचे मालक निसार सय्यद यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

या वेळी गुन्हे प्रकटीकरणचे श्री गणेश कड साहेब, माजी नगरसेवक श्री सिद्धार्थ थोरवडे , माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते श्री मुकुंद चरेगावकर , श्री समाधान चव्हाण व आदिमाया मंडळाचे श्री किरण मुळे व मा नगरसेवक गंगाधर जाधव, माजी नगरसेवक श्री शिवाजी पवार (तात्या )व पोलीस अधिकारी श्री तारू साहेब, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. या त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल दोघांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page