वैद्यकीय शिबीरात १४५ जणांचा सहभाग
‘शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन’तर्फे आयोजन
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन’ आणि स.प.महाविद्यालय आणि ‘लायन्स क्लब ऑफ ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी ‘च्या संयुक्त विदयमाने आयोजित वैद्यकीय शिबीरात १४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत वैद्यकीय शिबीराचे आयोजन स.प.महाविद्यालयातील स्टुडंट्स हॉल येथे करण्यात आले होते.
केसांच्या समस्या,त्वचा विकार,हाडांचा ठिसूळपणा यावर मार्गदर्शन तसेच,मॅग्नेटिक क्वांटम अनॅलिसिस या निदान पद्धतीनुसार तपासणीची व्यवस्था या वैद्यकीय शिबिरात मोफत करण्यात आली होती.शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांनी काम केलेल्या ६३ व्या इंजिनिअर रेजिमेंटचे निवृत्त मेजर कुंवरजित सिंग पनेसर यांच्या हस्ते उदघाटन झाले.
फाऊंडेशनच्या संस्थापक श्रीमती गीता गोडबोले यांनी स्वागत केले. स.प.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल गायकवाड,’शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन’ चे उपाध्यक्ष सतीश राजहंस,विश्वस्त सुधा कुलकर्णी,डॉ.हरिष पाटणकर, सुजय गोडबोले, ‘लायन्स क्लब ऑफ ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी’च्या अध्यक्ष माधुरी पंडित,चंद्रहास शेट्टी, रेखा शेट्टी, प्रसन्न भांडारकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.स.प.महाविद्यालयच्या प्रा.श्रीमती बुटाला यांनी आभार मानले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636