हेरले येथील क्षितिज सामाजिक संस्थेच्या वतीने 193 वी सावित्रीबाई फुले जयंती साजरी
पुणे न्यूज एक्सप्रेस :
प्रतिनिधी / संदीप कोले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने क्षितिज संस्था हेरले यांच्या वतीने हेरले येथे एकल महिलांची सभा घेण्यात आली यामध्ये संस्था अध्यक्ष व माजी सभापती जयश्री कुरणे यांनी एकल महिलांशी संवाद साधला. त्या म्हणाले की एकल महिन्याच्या मुद्द्यावर सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांनी काम सुरू केले
आज पुरोगामी महाराष्ट्रातील आपण महिला म्हणून आपली ही जबाबदारी आहे की त्यांनी सुरू केलेले काम आपण पुढे न्यायचे आहे. क्षितिज संस्था हेरले यांच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यातील विविध गावांमध्ये एकर महिलांचं संघटना स्थापन करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून सुरू झाले,असून याचा उद्देश एका महिलांचे प्रश्न शासन दरबारी लावून धरणे व महिला धोरणांमध्ये या प्रश्नांना अग्रक्रम प्राप्त करून देणे हा असून त्यासाठी संघटित रित्या आपण एकत्र आले पाहिजे.व आपल्या प्रश्नांवरती बोललं पाहिजे असे मत जयश्री कुरणे यांनी मांडले
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी आपण हेरल्यामध्ये एकल महिला संघटना स्थापन करीत आहोत. अशी घोषणा करण्यात आली याप्रसंगी क्षितिज संस्थेचे कार्यकर्त्या सुजाता कचरे, वंदना कांबळे, सुमन चौगुले,व इतर एकल महिलांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636