२७९ इचलकरंजी मतदारसंघात मतदान जनजागृती साठी सायकल रॅली मोठ्या उत्साहात संपन्न .
पुणे न्यूज एक्सप्रेस :
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक -२०२४ यासाठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सहा. निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये सुद्धा स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती साठी विविध उपक्रम राबविले आहेत.या अनुषंगाने रविवार, दि.२८ एप्रिल रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या हस्ते सकाळी ६.०० वाजता शहरातील शिवतीर्थ येथून सायकल रॅलीचा शुभारंभ करणेत आहे. मंगळवार दि. ७ मे २०२४ रोजी लोकशाही बळकटीकरणा साठी सर्वांनी मतदान करणेचे आवाहन या सायकल रॅलीच्या माध्यमातून करणेत आले.
या सायकल रॅलीची सुरुवात शिवतीर्थ येथे होवून त्यानंतर तारदाळ – खोतवाडी – कोरोची – कबनुर – चंदुर ते परत शिवतीर्थ असा ५० किलोमीटर प्रवास करत मतदान जनजागृती करत शिवतीर्थ येथे सायकल रॅलीची मोठ्या उत्साहात सांगता करणेत आली.
या मतदान जनजागृती साठी आयोजित सायकल रॅली मध्ये शहरातील आय. एम.फिट क्लब, रिंगण फिटनेस, टीम अर्जुना, टीम भारत, टीम उदय सर,एक.के.फिटनेस,आर.बी.सी.
गृप, मॉर्निंग गृप, सह्याद्री सायकल क्लब, सायकल क्रेझी, स्वस्त रहे मस्त रहे, निलेश फिटनेस क्लब, डॉक्टर गृप, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी युनिकोड, राजाराम वॉकर आदींचे सायकल पट्टु सहभागी झाले होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636