सह्याद्री हॉस्पिटलसह ६० ते ७० रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकीने खळबळ
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे :अज्ञात व्यक्तीने सह्याद्री हॉस्पिटलसह ६० ते ७० रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवलाय, असा धमकीचा ई-मेल पाठवला. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने डेक्कन परिसरात धाव घेऊन हॉस्पिटलची तपासणी केली.यावेळी बॉम्बशोधक पथकही होते. तपासणीनंतर कुठलीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही.
त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याचा हा खोडकरपणा नेमका कुणी केला? याचा तपास सध्या पुणे पोलिसांकडून केला जात आहे. सध्या पोलिसांचे पथक रुग्णालय परिसरात ठाण मांडून आहेत.
तसेच ज्या ई-मेलवरून रुग्णालयांना धमकी आली, त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे. पुणे शहरातील डेक्कन परिसरात सह्याद्री हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या ई-मेलवर सोमवारी (ता. १७) एका अज्ञात व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल पाठवला. यामुळे रुग्णालयातील डॉक्टर चांगलेच धास्तावले.त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांची बॉम्बशोधक पथकासह रुग्णालय गाठले. यावेळी हॉस्पिटलचा कानाकोपरा तपासण्यात आला. मात्र, कुठलीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, धमकी देणाऱ्या व्यक्तीने एकाचवेळी शहरातील ६० ते ७० रुग्णालयांने हे धमकीचे मेल पाठवले होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636