74 वा भारतीय संविधान दिन हेरले येथे मोठ्या उत्साहात साजरा
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले
विश्वरत्न,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वर्ष 11 महिने 18 दिवस अखंड परिश्रम करून भारत देशाला संविधान बहाल केले हे संविधान अंगीकृत करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो त्याच दिवसाचे औचित साधून हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने संविधान सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बौद्ध बांधवांनी संयुक्तरित्या हार अर्पण करण्यात आला त्यानंतर मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये गावातील विविध ठिकाणी भारतीय संविधानाची उद्देशिकेचे वाचन करण्यात आले त्यानंतर ही मिरवणूक गावातील विहारांमध्ये आली त्यावेळी सामुदायिक पंचशील व सामुदायिक भारतीय संविधानाची उद्देशिका चे वाचन करण्यात आले या मिरवणूक मध्ये सहभाग झालेल्या सर्वच समाजाच्या नागरिकांचे समाजाच्या वतीने आभार, आभार मानून सांगता करण्यात आली .
या मिरवणुकीला उद्योगपती सरदार आवळे व बौद्ध समाजाच्या बांधवांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. या मिरवणूक मध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान, मुले, मुली महिला, पुरुष मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636