लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) च्या वतीने रामविलास पासवान यांची ७८ वी जयंती साजरी
78th birth anniversary celebration of Ram Vilas Paswan on behalf of Lok Jan Shakti Party (Ram Vilas).
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर-जिल्ह्याच्या वतीने आज साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात पक्षाचे संस्थापक पद्मभूषण दिवंगत रामविलास पासवान यांची ७८ वी जयंती साजरी करण्यात आली.पासवान यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी पुणे शहर-जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट,अमर पुणेकर,के.सी.पवार,एडवोकेट अमित दरेकर,रोहित जसवंते,विजय अठवाल,कैलास पिंगळे,जॉन्सन कोल्हापुरे,अनिल मुळवणे,सागर जगताप, माया पंडित,अनुश्री यादव,यमुना साळवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
‘रामविलास पासवान यांच्या संकल्पनेतील योजना आणि उपक्रम सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे आणि निवडणुकांमध्ये त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते सत्तेत लोकसेवेसाठी पोहोचविणे,हीच आदरांजली ठरेल.त्यासाठी सर्वानी कटिबद्ध व्हावे’,असे प्रतिपादन संजय आल्हाट यांनी यावेळी बोलताना केले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636