दुचाकी काढून घेत वृध्देस मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : राजारामपुरीतील दुस-या गल्लीत रणनवरे कॉम्प्लेक्स येथे रहात असलेला प्रसन्न आवटी (रा. राजारामपुरी, आवटी गल्ली) याने वृद्धेस मारहाण करून जबरदस्तीने त्यांची दुचाकी काढून घेतली. ही घटना शनिवारी (दि. ५) दुपारी एकच्या सुमारास घडली. ‘तुमच्या मुलाने १४ लाख रुपये घेतले आहेत. पैसे द्या, नाहीतर तुमची दुचाकी घेऊन जातो,’ असे म्हणत तो दुचाकी घेऊन गेला. याबाबत वृद्धेचे जावई अतुल मधुसुदन रांगणेकर (वय ६७, रा. राजारामपुरी, दुसरी गल्ली) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आवटी याच्यावर गुन्हा दाखल केला.
……………………………..
रंकाळा-हुपरी बसमध्ये महिलेच्या दागिन्यांची चोरी.
कोल्हापूर : रंकाळा-हुपरी बसमध्ये रंकाळा स्टँड ते गंगावेश दरम्यान प्रवासात चोरट्याने महिलेच्या पर्समधील दागिन्यांची डबी लंपास केली. डबीत सुमारे ३७ हजार रुपये किमतीचे साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने होते. ही घटना शुक्रवारी (दि. ४) दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. याबाबत उमा दीपक कुंभार (वय २५, रा. गडमुडशिंगी) यांनी शनिवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636