चोरट्यांच्या टोळीस अटक करून दोन मोबाईलसह एक लाख 92 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.


पुणे न्यूज एक्सप्रेस :

मुरलीधर कांबळे :


स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.

कोल्हापूर – स्थानिक गुन्हें अन्वेशनच्या पथकाने जबरी चोरी प्रकरणातील टोळीस अटक करून त्यांच्या कडून एक लाख 92 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात अटक केलेल्यात रवि नामदेव पोवार (वय 25),अजय चंद्रकांत चव्हाण (वय 25),सचिन अशोक चव्हाण (वय 26)आणि विनायक अनिल चव्हाण (वय25.सर्व रा.शांतीनगर ,मुडशिंगी ता.करवीर ) याचा समावेश असून त्यांना पुढ़ील तपासासाठी शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Advertisement

अधिक माहिती अशी की,कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात होत असलेल्या चोरी प्रकरणात वाढ़ झाल्याने पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास तपास करून चोरीचे गून्हें उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या प्रमाणे पथके तयार करून तपास करीत असताना या पथकाला शाहुपुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेला रेकॉर्डवरील गुन्हेंगार रवि पोवार हा दि.12/05/2024 रोजी दुचाकीवरुन उचगाव परिसरात असलेल्या हॉटेल अविनाश समोर येणार असल्याचे समजले वरून तेथे सापळा रचून यांच्याकडे दोन दोन मोबाईल संच आढ़ळुन आले.त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली असता त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दि.31/03/2024 रोजी लोणार वसाहत येथे रात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरुन आलेल्यांना मारहाण करून त्यांच्याकडील जबरदस्तीने मोबाईल काढ़ुन घेतल्याची कबुली दिली असता त्यांना ताब्यात घेऊन दोन मोबाईलसंच आणि इतर असा एक लाख 92 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page