सिद्धरेखा फाउंडेशन भारत संस्थेच्या प्रथम वर्धा मध्ये दिनानिमित्त जैन गुरुकुल आश्रम मधील मुलांचे आरोग्य चेकअप शिबिर संपन्न झाले
पुणे न्यूज एक्सप्रेस :
आज रविवार दिनांक 15,/09/2024रोजी सिध्दरेखा फाऊंडेशन भारत संस्थेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त जैन गुरूकुल आश्रम येथील गरिब मुलांचे वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री डॉ.निलेश कुंभारे व नाशिक शहर अध्यक्षा सौ डॉ. अश्विनी कुलकर्णी मॅडम यांनी 55 मुलांचे आरोग्य तपासणी शिबीर व औषधे उपलब्ध करण्यात आले .
या वेळी अनेक मुलांना पावसामुळे ओलसर कापडे वापरल्याने खाज खुजली त्वचा चे अनेक अडचणी होत्या त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच संस्थेचे पदाधिकारी श्री संदीप काकड यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना बिस्कीट व कर्तव्यदक्ष फाऊंडेशन टिम कडून टोस्ट खारी वाटप व डॉक्टर तसेच जैन गुरूकुल आश्रम चे मामाजी यांचे शाल पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला
हा कार्यक्रम आयोजित कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन वतीने घेण्यात आला होता यासाठी श्री सुनील परदेशी विरेंद्र टिळे राजेंद्र आहेर, सुभाष कापडी, जयवंत देशमुख, संदीप काकड, आदित्य पवार, रुपाली तांबारे सुनिता धनतोले कामिनी भानुवंशे, भाग्यश्री खुरपडे, सौ. काकड वहिनी व कन्या उपस्थित होते याप्रसंगी जैन गुरूकुल आश्रम चे श्री मामाजी , सुनिल परदेशी, डॉ निलेश कुंभारे, डॉ अश्विनी कुलकर्णी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले तसेच संदीप काकड यांनी आभार मानले

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636