शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा आयोजन करणेसाठी महानगरपालिका येथे बैठक संपन्न


A meeting was held at the Municipal Corporation to organize the school government sports competition

पुणे न्यूज एक्सप्रेस :

इचलकरंजी : सन २०२४-२५ या वर्षातील शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत क्रीडाशिक्षक व संबंधितांची बैठक इचलकरंजी महानगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती.

या बैठकीसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाक्रीडाधिकारी सौ. नीलिमा आडसूळ, इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे, ज्येष्ठ क्रीडा संघटक शेखर शहा, रा. छ. शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार, जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर, क्रीडा अधिकारी सौ. रोहिणी मोकाशी, महानगरपालिकेचे सहा. क्रीडाधिकारी संजय कांबळे, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे, आकाश माने, हॉकी कोच सागर जाधव तसेच इचलकरंजीतील क्रीडाशिक्षक, महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षक, विविध खेळांचे प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा. छ. शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी केले

महानगरपालिका क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे यांनी आपल्या मनोगतात मागील वर्षी महानगरपालिकेच्या क्रीडा स्पर्धा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच चालू वर्षीही मनपास्तरीय स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. आयुक्तसो, इचलकरंजी मनपा यांच्या सूचनेनुसार सदर स्पर्धा अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडायच्या असून त्यासाठी आयुक्त आणि संपूर्ण महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

ज्येष्ठ क्रीडा संघटक शेखर शहा यांनी इचलकरंजीतील क्रीडा संस्कृतीचा आढावा घेऊन या शहरात सर्व क्रीडा स्पर्धा अत्यंत शांततेने व वादविवादाविना पार पडत असल्याचे सांगितले. यावर्षीही सर्वांनी एकत्र येऊन स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडाव्यात असे आवाहन केले. याप्रसंगी सेवानिवृत्ती निमित्त शेखर शहा यांचा इचलकरंजी महानगरपालिका क्रीडा विभागातर्फे सत्कार करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन कक्षात तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात सातत्याने पुढाकार घेणारे मनपाचे उपक्रीडाधिकारी श्री संजय कांबळे यांचा जिल्हाक्रीडाधिकारी सौ. नीलिमा आडसूळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Advertisement

मुख्य मनोगतामध्ये जिल्हा क्रीडाधिकारी सौ. नीलिमा आडसूळ यांनी संपूर्ण क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत मौलिक असे मार्गदर्शन केले. शासनातर्फे उपलब्ध असलेल्या विविध क्रीडा अनुदान योजनांचा लाभ शाळांनी व संस्थांनी घ्यावा असे आवाहन केले. या अनुदान सुविधेची अत्यंत बारकाईने व सर्वंकष अशी माहिती दिली.

क्रीडा शिक्षकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली. त्यामध्ये ऑनलाइन नोंदणी, स्पर्धांचे आयोजन, जन्मतारखेसंबंधीचे निकष, ग्रेस गुणांचे प्रश्न, काउंटर सिग्नेचर, विभागीय स्पर्धेवेळीचा निवासाचा प्रश्न, राष्ट्रीय खेळाडूंना मिळणारी स्कॉलरशिप, प्रमाणपत्रे वेळेत न मिळणे, पंचांचे मानधन, स्पर्धेचा खर्च अशा अनेक गोष्टींचा त्यांनी आपल्या भाषणात आढावा घेतला. तसेच शिक्षकांच्या विविध शंकांचे त्यांनी नेमकेपणाने उत्तरे देत समाधान केले.

शासकीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन अत्यंत उत्तमपणे करण्याची इचलकरंजीची परंपरा आपण सर्वांनी पुढे चालू ठेवावी असे आवाहन सौ. आडसूळ यांनी केले.

शेवटी इचलकरंजी मनपाचे क्रीडा पर्यवेक्षक श्री सचिन खोंद्रे यांनी आभार मानले तर क्रीडाशिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी, संभाजी बंडगर यांनी सूत्रसंचालन केले.

बैठकीसाठी क्रीडाशिक्षक विजय गुरव, रमेश चौगुले, आनंदा बंडगर, शाम कांबळे, रफिक मांगुरे, गणेश बरगाले, भिकाजी माने, विश्वनाथ माळी, अमित कागले, सुहास पोवळे, राजेश चौगुले, रवी चौगुले, सौ. शिला माने, अमित कुंडले, अजित शेट्टी, संतोष गायकवाड, संयम हुक्कीरे, प्रवीण कोळी, कृष्णा आडकिल्ला, तुषार जगताप, अमर भिसे, इम्रान तासगावे, कोळी, बाळासाहेब गायकवाड, राहुल रजपूत इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page