इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत मोटरसायकल रॅली संपन्न
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी : ‘हर घर तिरंगा’ मोहीमे अंतर्गत इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने सोमवार दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या *मोटरसायकल रॅलीचे आयोजन करणेत आलेले होते.
या रॅलीमध्ये महानगरपालिकेचे अति.आयुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त सोमनाथ आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रॅली दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत इचलकरंजी शहरवासीयांनी दि.१३ ऑगस्ट तेदि.१५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवणेचे आवाहन करणेत आले.
सदर रॅलीचा मार्ग छत्रपती शाहू महाराज पुतळा – शिवतीर्थ – महात्मा गांधी पुतळा – लोकमान्य टिळक पुतळा – रसना कॉर्नर – श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह – चांदणी चौक – छत्रपती संभाजी महाराज चौक – शिवतीर्थ ते महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे सांगता करणेत येवुन या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली.
आजच्या रॅली मध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा. आयुक्त विजय राजापुरे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, सदाशिव शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, धनंजय पळसुले, विजय पाटील, सुर्यकांत चव्हाण, महादेव मिसाळ यांचेसह सर्व अधिकारी कर्मचारी तसेच प्राथमिक माध्यमिक शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636