रुकडीत मराठा आरक्षण साठी एक दिवसाचे लक्षणीय उपोषण.
विशेष प्रतिनिधी – संभाजी चौगुले
रुकडी (तालुका हातकणंगले) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देणे साठी सकल मराठा समाज रुकडी यांचे एक दिवसाचे लाक्षणीय उपोषण अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास रूकडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी सोमवारी 30 /10/ 2023 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून लक्षणीय उपोषणाला सुरुवात केली आहे.
यावेळी रुकडी गावातील विविध मुस्लिम समाज, जैन समाज, लिंगायत समाज, नाभिक समाज, बौद्ध समाज,यांनी ही पाठिंबा दर्शवून व प्रतिनिधी पाठवून पत्र देऊन या उपोषणास पाठिंबा दर्शवला असून प्रत्येक समाजाच्या वतीने गावातील नागरिक उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636