खासदार धनंजय महाडिक यांना अतिग्रे येथील बाधित शेतकरी व मिळकतदार यांचेकडून चार पट दर मागणीसाठी निवेदन सादर
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले मधून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर प्रस्थापित महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनी व मिळकती धारकांना जादा दराने म्हणजेच चारपट नुकसान भरपाई मिळावी व अतिग्रे मध्ये बेघर वस्ती पूर्णपणे भूमिहीन होणार आहे त्यांना योग्य स्वरूपाचा मोबदला मिळावा व उड्डाणपूल भरावाचा न होता तो प्लेअरचा व्हावा यासाठी माननीय खासदार धनंजय महाडिक सो राज्यसभा सदस्य यांना अतिग्रे येथील बाधित मिळकतदार व शेतकरी यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की चारपट दराने मोबदला हा मिळालाच पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन तसेच स्वतः खासदार साहेब यांनी अतिग्रे येथील शिष्टमंडळ समोर नॅशनल हायवे ऑफिसला फोनवर निरोप दिला की अतिग्रे येथील शेतकरी व मिळकतदार माझ्यासमोर निवेदन देण्यासाठी आले आहेत तरी आपण फेर प्रस्ताव चारपट पाठवा पुढील प्रस्तावा बाबत संसदेत मी स्वतः चर्चा करीन तसेच बाधित मिळकतदार व शेतकरी यांना सांगण्यात आले की मी तुमच्या बरोबर कायमस्वरूपी पाठीशी आहे लागेल त्यावेळी सहकार्य करीन
उपस्थित अतिग्रे येथील श्री अॅडव्होकेट चिंतामणी कांबळे, विष्णू अण्णा कुंभार ,आनंदा पाटील ,बाजीराव लोहार ,संजय सूर्यवंशी, आत्माराम बिडकर, जयसिंग मुसळे ,आकाराम कावणे, शीलवंत बिडकर, संदीप बिडकर ,भरत शिंदे ,सागर खोत ,विजय पाटील ,सुहास कुंभार ,पाटोळे ,संग्राम जाधव, शुभम लोहार ,व सर्व बाधित शेतकरी व मिळकतदार उपस्थित होते
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636