शनिवार पेठेत झाडाची फांदी डोक्यावर पडून अभिजीत गुंड या तरुणाचा मृत्यू
पुणे : शनिवार पेठेत झाडाची फांदी डोक्यावर पडून अभिजीत गुंड या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली.महापालिकेतील सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील वृक्ष संवर्धन समिती शहरातील वृक्षांच्या संवर्धन आणि छाटणी बाबत कार्यवाही करत असते.
धोकादायक वृक्ष किंवा फांद्या छाटणी करता नागरिक या समितीकडे अर्ज करीत असतात. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या उंबराच्या झाडाच्या फांदीबाबत ऑनलाईन तक्रार नोंदविली गेली असताना ती फांदी न तोडताच महानगरपालिके च्या संबंधित कर्मचाऱ्यांने ऑनलाइन तक्रार बंद केल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच या घटनेत दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या अभिजीत गुंड या तरुणाच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळावी, तसेच यापुढे अशा घटनांमध्ये शहरातील नागरिकाचे जीवित धोक्यात येऊ नये म्हणून शहरातील सर्व धोकादायक वृक्षांची पाहणी करून तेथे आवश्यक ती कार्यवाही व्हावी. पुणे शहर आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी ही मागणी केली आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636