सीपीआर रुग्णालयात उपचार घेण्यास आलेल्या रुग्णाचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून घेतलेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यु.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर: मुरलीधर कांबळे :
A young man who jumped from the fourth floor of a patient who came to CPR hospital for treatment died during treatment.
कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयातील खळबळजनक प्रकार.
कोल्हापूर – सीपीआर रुग्णालयात उपचार घेण्यास आलेल्या साताप्पा भंडेराव लोहार (वय 35.रा.आकुर्डे ,भुदरगड.) याने रविवार दि.18/08/2024 रोजी दुपारच्या सुमारास मोबाईलवर बोलत असताना दुधगंगा विभागाच्या रिकाम्या असलेल्या खिडकीतुन उडी मारून घेतलेल्या तरुणांचा रात्री आठच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यु झाला. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत साताप्पा लोहार यांने बुधवार (दि.14) रोजी रात्री आठच्या सुमारास रहात असलेल्या घरात नजरचुकीने विषारी औषध सेवन केले होते.त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्याच्यावर दुधगंगा विभागात उपचार चालू असून त्यात तो बरा झाला होता.सोमवारी त्याचा डिसचार्ज ही होणार होता.त्याने आज दुपारच्या सुमारास मोबाईलवर बोलत असतानाच अचानक त्याने रिकाम्या असलेल्या खिडकीतुन उडी मारल्याने तेथे एकच खळबळ उडाली.यात तो गंभीर जखमी झाल्याने उपस्थित असलेल्या नागरिकांनी सीपीआर येथील अपघात विभागात दाखल केले.हा प्रकार त्याच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडल्याने त्यांना अश्रु अनावर झाले होते.यातील जखमी हा मुंबई येथे एका हॉटेलात नोकरीस असून तो सुटीवर आपल्या गावी आला होता.त्याला एक लहान मुलगा असून त्याने हा प्रकार का केला हे समजू शकले नाही.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636