नवभारतीय शिव वाहतूक संघटने चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अब्बास शेख यांनी रिक्षा चालकांना दिवाळी मिठाई वाटप केली
पुणे न्यूज एक्सप्रेस :
अन्वरअली शेख
देहूरोड शहर : नवभारतीय शिव वाहतूक संघटने चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अब्बास शेख यांनी हाजी अराफत शेख यांच्या संकलपनेतून देहूरोड शहरातील रिक्षा चालकांना दिवाळी मिठाई वाटप करत दिवाळी साजरी केली.
अब्बास शेख नेहमी विविध उपक्रम राबवत असतात आज प्रेस मीडिया लाईव्ह चे पुणे जिल्हा प्रतिनिधी यांनी नवभारतीय शिव वाहतूक संघटने चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अब्बास शेख यांच्याशी मुलाखत घेतली असता अब्बास शेख म्हणाले मी सफाई कर्मचारी आणि निराधार गोरगरीब देखील दिवाळी फराळाचे वाटप कणार आहे,आणि मी हे कार्य मा.अल्पसंख्याक आयोग मंत्री हाजी अराफत शेख यांच्या मार्गदर्शनाने करत आहे
त्यावेळी ह्यूमन राइट्स असोसिएशन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी , युवक काँग्रेस देहूरोड शहर अध्यक्ष मलिक शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मावळ तालुका कार्याध्यक्ष सुनील गायकवाड ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महारष्ट्रा इंदरपाल सिंग रत्तू,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देहूरोड उपाध्यक्ष अशोक चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देहूरोड शहर वरिष्ठ कार्यअध्यक्ष सुरेश गायकवाड, पुणे खबर मुख्य संपादक रज्जाक शेख, फरहत अत्तार सामाजिक कार्यकर्ते, इत्यादी उपस्थित होते
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636