कोमल कांबळे यांचे अपघाती निधन
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कुरुंदवाड : नवे दानवाड ता शिरोळ येथील युवा सामाजीक कार्यकर्ते कोमल हुवाप्पा कांबळे यांचे कुरुंदवाड पाच मैल या राज्य महामार्ग वर मोटरसायकल वरुन हेरवाड कडे जात असताना चुकीच्या दिशने चार चाकी तवेरा गाडी येऊन मोटार सायकला जोराची धडक दिल्याने भीषण अपघातामुळे जखमी झाले होते उपचारा दरम्यान सोमवारी सकाळी 11.00 मुत्यु झाला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व आई असा परिवार आहे
कुरुंदवाड येथील अनिश हॉस्पिटल समोर चुकीच्या दिशेने येऊनअपघात करून कोमल कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत प्रकरणी चार चाकी चालक मौला मेहबूब जुगळे राहणार निपाणी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव यांच्याविरोधात कुरुंदवाड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कुरुंदवाड येथील अनिस हॉस्पिटलच्या समोर सलगर पाचवा मैल या राजमहामार्गावर रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारासमयत कोमल कांबळे हा MH09, EG 8319 या हिरो होंडा स्प्लेंडर या दुचाकीवरून हेरवाड कडे जात असताना यातील संशयित आरोपी मौला जूगळे हा चार चाकी तवेरा MH05 , R -3646 कुरुंदवाड कडे येत असताना चुकीच्या दिशेने येऊन कोमल कांबळे यांच्या दुचाकी गाडीला जोराची धडक दिल्यामुळे अपघात झाला .
कांबळे याला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारा करिता सांगली येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान सोमवारी सकाळी अकरा वाजता त्यांचे निधन झाले नवे दानवाड येथील स्मशान भूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .बुधवारी जलदान विधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636