खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा.
Accused in murder case sentenced to life imprisonment.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – प्रा.डॉ.कृष्णा किरवले यांचा दि.03/03/2017 रोजी खून झाला होता.या प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.गोंधळेसो यांनी प्रितम गणपती पाटील (वय 42.रा.म्हाडा कॉलनी,एसएससी बोर्डच्या मागे ,को) याला जन्मठेपेच्या शिक्षेसह 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत आणि आरोपी शेजारी शेजारी रहात असून आरोपीनी मयताचा बंगला खरेदीचा व्यवहार 2017साली झाला होता.त्यांच्यात 03/03/2017 रोजी संचकारपत्राची नोंदणी केली होती.त्याच वेळेस यांच्यात आर्थिक कारणामुळे वाद झाल्याने आणि संचकारपत्राची मुळ प्रत न दिल्याने आरोपी प्रितम याने दि.03/03/2017 रोजी मयताच्या बंगल्यात दुपारी साडे चारच्या सुमारास डॉ.कृष्णा किरवले यांच्या कपाळावर ,मानेवर ,गळ्यावर आणि डोक्यात कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता.याची फिर्याद विजयसिंह मोहनसिंग रजपूत (रा.म्हाडा कॉलनी, एसएससी बोर्डच्या मागे) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.पोलिसांनी प्रितम गणपती पाटील आणि मंगल गणपती पाटील (मयत) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.सदरचा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश एस.पी.गोंधळेसो यांच्या कोर्टात चालून सरकारी वकील एस.एस.तांबेकर यांनी 17 साक्षीदार तपासून या साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी व कोर्टापुढ़े सादर केलेला सबळ पुरावा आणि सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानुन जिल्हा सत्र न्यायाधीश एस.पी.गोंधळेसो यांनी आरोपी प्रितम गणपती पाटील यांला जन्मठेपेची शिक्षेसह 20 हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली.दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे .यातील दुसरा आरोपी मंगल गणपती पाटील या मयत झाल्या आहेत.या गुन्हयाचा तपास राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख ,तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी भारतकुमार राणे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत अमृतकर यांनी केला होता.
याकामी सरकारी वकील Ad.एस.एस.तांबेकर यांना कोर्ट पैरवी .अशोक शिंगे महिला फौजदार नाझनीन देसाई आणि Ad.रक्षलेखा निकम यांनी मदत केली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636