हेरले येथे मटका अड्ड्यावर कारवाई
विशेष प्रतिनिधी: संभाजी चौगुले :
हेरले (तालुका हातकणंगले) येथे राजरोस सुरू असणाऱ्या मटका अड्यावर हातकणंगले पोलिसांनी छापा टाकून मटका घेणाऱ्या दोन व्यक्तीसह मालक दस्तगीर महालिंगपूरे, आणि जमीर मुजावर याच्यावर कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी अवैध आणि बेकायदेशीर धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या मुख्य चौकामध्ये राजरोस पणे मटका सुरू असल्याची माहिती हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांना गोपनीय व्यक्तीकडून मिळाल्याने त्यांनी तात्काळ कारवाईसाठी पथक रवाना केले.
या पोलीस पथकाने हेरले इथं मुख्य चौकामध्ये असणाऱ्या दूध डेअरी जवळ बेकायदा मटका अड्ड्यावर धाड टाकून हर्षद शौकत खतीब याला ताब्यात घेऊन रोख 630 रुपयासह मटक्याच्या चिट्ट्या ताब्यात घेण्यात आल्या. तर हनुमान मंदिर मुख्य चौकामध्ये राजरोसपणे सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यावर ही धाड टाकून राहुल संभाजी साळुंखे याच्यासह रोख चार हजार 170 रुपये आणि मटक्याचा चिट्ट्या ताब्यात घेतल्या.या दोन मटका घेणाऱ्या व्यक्ती सह बुकी चालक दस्तगीर महालीगपुरे आणि जमीर मुजावर याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीपी पथकाचे अतुल निकम, संग्राम खराडे यांनी केली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636