भेसळयुक्त खवा चक्का पनीर उत्पादक माफीयांचे शिरोळ तालुक्यात थैमान , शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
संतोष आठवले
कोल्हापूर : भेसळयुक्त खवा चक्का व पनीर उत्पादक माफिया यांचा शिरोळ तालुक्यातील अकिवाट . मजरेवाडी .हेरवाड , सै . टाकळी खिद्रापूर अ .लाट ,आलास .गणेशवाडी कवठेगुंलद नृसिंहवाडी . यड्राव ,टाकवडेआदी गांवात भेसळयुक्त खवा .चकका व पनिर उत्पादन मोठ्या प्रमाणात करित असुन मुंबई ,पुणे , गोवा , हैदराबाद आदी मोठ्या शहरात व शेजारील इतर राज्यात वितरण केले जाते याकडे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्रालयाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे अश्या भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांवर कडक निर्बंध घालण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत आहे
शिरोळ तालुक्यातील अकीवाट मजरेवाडी हेरवाड तेरवाड येथील माळभाग परिसरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा बनवण्याचा कारखाना आहे दिवसाला हजारो टन खव्याचे उत्पादन येथे होत असते एक किलो खवा बनवण्यासाठी पाच लिटर दुधाची आवश्यकता असते येथील एका आस्थापणे मध्ये दररोज 3000 टन खवा उत्पादन केले जाते या करिता सुमारे 15000 लिटर दुधाची गरज असते या परिसरातून हजारो लिटरची उत्पादन क्षमता नाही मग एवढ्या मोठ्या पद्धतीने खावाची उत्पादन होते कसे हा यक्ष प्रश्न आहे ? खवा उत्पादक आस्थापनामध्ये कृत्रिम दुधाची निर्मिती केली जाते एक लिटर दूध व एक लिटर पामतेल आणी निकृष्ढ दर्जा चे दूध पावडर या पासुन 13 लिटर कृत्रिम दुधाची निर्मिती केली जाते तसेच नॉट फॉर सेल असलेली कर्नाटक राज्यातील नामांकीत दुध पावडर ची तस्करी याच भेसळयुक्त दुग्धजन पदार्थ माफीया यांच्याकडून केले जाते
हा भेसळयुक्त खवा चक्का पनिर उत्पादक हे पाहटे 3.00 वाजता काही मोजकेच कामगार घेऊन कृत्रिम दुध निर्मिती केली जाते त्यानंतर ते दुध जाळवू लाकुड वापरून ते अनाधिकृत बॉयलर वर गरम करून खवा तयार केला जातो व सकाळी सातच्या आत खाजगी वहानातून खाजगी ड्राव्हल बस व महाराष्ट्र शासनाची एस टी बस या द्वारे लेबल नसलेल्या प्लस्टिक बॅग्ग मधुन पॅकेज करून वाहतूक केली जाते
भेसळयुक्त दुग्धजन पदार्थामुळे मानवी शरीरावर हृदय किडनी व यकृत निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे दुधातील भेसळी मुळे शरीर वाढीसाठी आवश्यक असणारे लायसीन व अमोनिया आम्ल शरीरात उपलब्ध होत नाही परिणामी लहान मुलांच्या शरीर वाढीवर परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदयविकारासारखे आजार जडत आहेत कॅन्सर रुग्णांची सुद्धा वाढ होत आहे
या दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्याची जबाबदारी पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 22 जून 2023 रोजी मंत्रालयातील एका बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक , संबधीत जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त ,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वैधमापन शास्त्रांचे उपनिबंधक व जिल्हा दुग्धविकास अधिकारी हे सदस्य असलेली समिती गठीत केली आहे पण हे केवळ राज्य शासनाचा देखावा असल्याचे सामान्य जनतेतून बोलले जात आहे
खवा चक्का व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी महाराष्ट राज्यात किती लिटर दूध वापरण्यात येते याची आकेडीवारी शासनाने जाहीर करून या व्यवसायाला नियंत्रित करण्यासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे
दुग्धजन्य उत्पादक माफिया हे ग्रामीण भागातील दुर्गम भागात उत्पादन करत आहेत तर विक्री मोठया शहरात करून मोठा नफा कमवत आहेत यांना मागदर्शन करणारी व्यक्ती या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र व प्राणीशास्त्र (हार्मोनियम ) विभागातून उच्च शिक्षण घेतलेल्या आहेत तसेच अन्न औषध प्रशासनातील काही अधिकारी यांचा ही समावेश आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636