कौलव येथे गुप्त धनाच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य , मांत्रिकासह पाच जण ताब्यात.
Aghori act under the pretense of secret money in Kaulav, five persons including a magician arrested
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – राधानगरी तालुक्यातील कौलव येथे रहात असलेले शरद धर्मा माने यांच्या घरात नरबळी अघोरी कृत्य चालू असल्याची माहिती मिळाली असता राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे हे आपल्या पोलिस स्टाफसह घटना स्थळी जाऊन या प्रकरणी तेथे उपस्थित असलेल्या मांत्रिकासह पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांचे कडील असलेले साहित्य जप्त केले आहे.यात शरद धर्मा माने (वय.52रा.कौलव )महेश सदाशिव काशिद (मांत्रिक वय 45रा.राजमाचे ता.कराड) आशिष उमेश चव्हाण (वय 35 .रा.मंगळवार पेठ कराड) चंद्रकांत महादेव धुमाळ (वय 40.रा.मंगळवार पेठ कराड ) संतोष निवृत्ती लोहार (वय 42.रा.वाझोली ,पाटण) आणि कृष्णात बापू पाटील (वय 55.रा.पु.शिरोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की,कौलव येथे रहात असलेले शरद धर्मा माने यांना कराड येथील मांत्रिक महेश काशिद यांनी तुमच्या घरात गुप्त धन असून ते शोधून देतो असे सांगितल्याने बुधवार दि.03/07/2024 रोजी शरद माने यांच्या घरी येऊन त्यांच्या घरात येऊन देवघरात खड्डा खणण्याचे काम चालू होते आणि आजू बाजूला लिंबू व पूजेचे इतर साहित्य पडलेले दिसले याची माहिती कौलव गावात पसरली असता तेथील ग्रामपंचायतीने याची गांभीर्याने घेऊन त्यांनी राधानगरी पोलिस ठाण्याला दिली असता पोलिसांनी घटना स्थळी जाऊन मांत्रिकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636