आप्पासाहेब उर्फ सारे पाटील फाउंडेशन मार्फत शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
दत्तवाड प्रतिनिधी :-
राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त दतवाड ता शिरोळ येथे आप्पासाहेब उर्फ सारे पाटील फाउंडेशन मार्फत शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात येतो या राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आप्पासाहेब उर्फ सारे पाटील फाउंडेशन मार्फत दत्तवाड येथील श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल, कुमार विद्यामंदिर , केंद्रीयकन्या विद्या मंदिर, उर्दू विद्या मंदिर येथील शिक्षक व गावातील सेवानिवृत्त शिक्षक यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला . श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल जूनियर कॉलेज, व केंद्रीय कन्या शाळा येथे शिक्षक सन्मान कार्यक्रम पार पडला.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उदय पाटील, सरपंच चंद्रकांत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य देवराज पाटील,बाबुराव पोवार , रावसाहेब पाटील, बसगोडा पाटील, सुरेश पाटील,प्रमोद पाटील , चंद्रशेखर कलगी, सुरज शिंगे ,दिलीप पाटील,एन.एस.पाटिल, संगीता झुणके ,अबोली कुरुंदवाडे, यांच्यासह नेजे शाळेचे मुख्याध्यापक संजय तावदारे परिवेक्षक सुरेश मलकाने केंद्रीय कन्या शाळा मुख्याध्यापक कुमार सिदनाळे कुमार विद्या मंदिर च्य मुख्याध्यापिका, सुनीता खटावकर, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक महंमदशफी पटेल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , गावातील सेवानिवृत्त शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636