अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली महानगर पालिकेची मनमानी
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली पुणे शहरात चालू असलेल्या पालिकेच्या मनमानी आणि बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी ‘पुणे शहर छोटव्यावसायिक , गाळेधारक, फ्लॅट धारक ,भाडेकरू महासंघ’ च्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सॅलिस्बरी पार्क येथील सोसायटीमधील हेतूपूरस्सर झालेल्या , दूजाभाव करणाऱ्या अतिक्रमण तोडणाऱ्या कारवाईची माहिती देखील या पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.
हसीब कलमानी,फिरोझ शेख,डॉ.पायल शाह,अशोक शिरवे,वीणा शाह,तेजस शाह हे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला संबोधित करतील.
वेळ :शनिवार,१३ जानेवारी रोजी दुपारी एक ते दीड , स्थळ : पुणे श्रमिक पत्रकार संघ, एस.एम. जोशी फाऊंडेशन जवळ, गांजवे चौक पुणे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636