आर्किटेक्ट, इंजिनियर्स असोसिएशनकडून आर्किटेक्ट, इंजिनियर आणि टीचर्स डे एकत्रित साजरा
एईएसए च्या नव्या कार्यकारिणीचे पदग्रहण
आर्किटेक्ट आणि इंजिनियर यांचा एकत्रित आविष्कार महत्वाचा : चेतन रायकर
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : आर्किटेक्ट, इंजिनियर्स अँण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन (एईएसए) तर्फे आर्किटेक्ट, इंजिनियर आणि टीचर्स डे एकत्रितपणे साजरा करण्यात आला. सोमवार,दि.७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पीवायसी जिमखाना येथे हा कार्यक्रम झाला. आर्किटेक्चर शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ.पूर्वा केसकर यांचा सत्कार करण्यात आला.अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील योगदाना बद्दल प्रा.धनंजय हिरवे यांना गौरविण्यात आले.
आर्किटेक्ट, इंजिनियर्स अँण्ड सर्व्हेअर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीचे पदग्रहण या वेळी करण्यात आले.ज्येष्ठ इंजिनियर चेतन रायकर यांचे ‘वास्तूसंवर्धन’ या विषयावर व्याख्यान झाले. ज्येष्ठ आर्किटेक्ट शब्बीर उनवाला यांनी ‘स्ट्रक्चरल जर्नी ‘ विषयावर मार्गदर्शन केले.
राजीव राजे (अध्यक्ष), संजय तासगावकर(उपाध्यक्ष),महेश बांगड (चेअरमन ),निनाद जोग (सचिव),जयंत पटवर्धन (खजिनदार), आलोका काळे(सहसचिव),आनंद कुंकूलोळ (सहसचिव) तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून शेखर गरुड, नितीन भोळे,नुपूर चिंचखेडे,अनिकेत नानकर,मनाली महाजन,ईशा उमराणी यांनी सूत्रे स्वीकारली.विश्वस्त म्हणून विश्र्वास कुलकर्णी, दिवाकर निमकर,जयंत इनामदार यांनी सूत्रे स्वीकारली. चेअरमन महेश बांगड यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. राजीव राजे यांनी प्रास्ताविक केले.उज्वल केसकर,पराग लकडे, पुष्कर कानविंदे,मकरंद गोडबोले,केशव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.ईशा काळे यांनी सूत्रसंचालन केले.
चेतन रायकर म्हणाले,’आर्किटेक्ट आणि इंजिनियर पूरक काम करतात,त्यांच्यात मतभेद असू शकतात. पण ते विरोधात असू नयेत. जुन्या महत्वपूर्ण ऐतिहासिक इमारतींचे संवर्धन करणे म्हणजे केवळ दुरुस्ती करणे नसते. दुरुस्ती हे आर्किटेक्टचे काम नसते, संवर्धन करणे हे त्याचे काम असते. हे वास्तू संवर्धन झाल्यावर ती आशीर्वाद देते. संवर्धन करताना वास्तू मालकाची भावनिक गुंतवणूक महत्वाची असते.बांधकाम करणे आणि नवनिर्मिती करणे यात मूलभूत फरक असतो.वास्तूसंवर्धन करताना चांगला स्ट्रक्चरल इंजिनियरची सेवा घेणे फायदेशीर ठरते.शब्बीर उनवाला यांनी ‘स्ट्रक्चरल जर्नी ‘ विषयावर मार्गदर्शन केले.वास्तू निर्मितीत स्ट्रक्चरचे महत्व त्यांनी सादरीकरणाद्वारे विशद केले.डॉ.पूर्वा केसकर,प्रा.धनंजय हिरवे यांनी मनोगत व्यक्त केले.ज्येष्ठ आर्किटेक्ट दिवंगत ख्रिस्तोफर बेनिंजर यांना कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली.
——————————-
(फोटो ओळ :आर्किटेक्ट, इंजिनियर्स अँण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन (एईएसए) तर्फे एकत्रितपणे आर्किटेक्ट, इंजिनियर आणि टीचर्स डे कार्यक्रम प्रसंगी डॉ.पूर्वा केसकर,प्रा.धनंजय हिरवे यांचा सत्कार करण्यात आला.)

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636