संधिवात कारणे व आयुर्वेदिक उपाय
पुणे न्यूज एक्सप्रेस :
संधि म्हणजे सांधा. सांध्याचा वात म्हणजे संधिवात. संधिवाताची स्थाने कोपरा, गुडघा, मान, मणका, कंबर.
कारणे –
थंड हवेत /जागेतकाळजी न घेता जास्त फिरणे, पोषक आहार न घेणे, A. C- फॅन चा अतिवापर, अयोग्य आहार -विहार. अयोग्य दिनचर्या, जागरण.
लक्षणे –
त्या सांध्यामध्ये वेदना होणे, सूज, हाडांची झीज होणे, हालचाल करताना त्रास.
औषध –
रासनादी गुग्गुळ, योगराज गुग्गुळ, लाक्षादी गुग्गुळ. दशमुलारिष्ट.
उपाय –
1)एक चमचा एरंडोल तेलाचे नियमित सेवन करणे.
2)महानारायण तेलाची मालिश व शेक घेणे
3)आस्कंद, शंख भस्म, सुंठ, प्रवाळ पंचामृत, गोखरू यांचे सेवन.
4)राजगिरा लाडू, हळीवाची खीर,सुजी, उडदाची खीर,अंडी, नॉनव्हेज,खारीक पावडर, दूध, तूप, डिंक पावडर सारखे पोषक घटकांचा आहारात वापर.
अपथ्य (काय खाऊ नये )-
हरभरा, पावटा, वरणा,फ्रीझ मधील अन्न,मध.
डॉ. ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
9175723404,7028612340
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636