असलम बागवान यांचा मतदारांशी थेट संवाद
असलम बागवान यांचा सायकलवरून प्रचार
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे: शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकसेना पार्टी चे अधिकृत उमेदवार, ओबीसी बहुजन पार्टी चे पुरस्कृत उमेदवार असलम इसाक बागवान यांनी सायकल वरून थेट मतदारांशी संवाद साधत प्रचार केला.हडपसर,कोंढवा पाठोपाठ त्यांनी -महमदवाडी,तराडे वस्ती सय्यदनगर–काळेपडळ–या भागात प्रचार केला. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे सायकलला भोंगा लावून सायकल वरून अगदी अल्पखर्चात लोकशाहीला अभिप्रेत असलेली मूल्ये मतदारांपर्यंत पोहचविण्या करीता ,जनतेचे प्रश्न जमिनी स्तरावर स्वतः समजून घेण्याकरीता प्रयत्न केला गेला.असलम इसाक बागवान यांनी आपल्या प्रचाराची सुरूवात हडपसर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र दिनी केली होती.
डॉ.सूर्यवंशी,सचिन अlल्हाट,अकबर मेमन, जब्बार बागवान, इब्राहिम शेख,आरिफ शेख,वीणा कदम यांनी या प्रचारात सहभाग घेतला.या प्रचारादरम्यान असलम इसाक बागवान यांनी जनतेशी संवाद साधताना त्यांच्या हे लक्षात आले की, आजपर्यंत कुठल्याच खासदाराला या जनतेने पाहिलेले नाही.त्यांची नावे देखील मतदारांना माहिती नाहीत.त्यांनी कधीही नागरीकांशी संवाद साधला नाही अथवा साधी भेटही घेतली नाही.
…………………………
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636