अट्टल दोघां घरफोड्या चोरट्यांना अटक करून 219 ग्राम सोन्याचे दागिने जप्त करून 13 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाची कारवाई.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- रेकॉर्डवरील दोघां अट्टल घरफोड्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाने घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणुन रियाज इमाम कुचनूर (वय 45.रा.विक्रमनगर ,इंचलकरंजी )आणि बंजरग रामचंद्र चौधरी (वय 54.रा.ढ़ोर गल्ली चांदणी चौक ,इंचलकरंजी) या दोघांना अटक करून त्यांच्या कडील 217gm.सोन्याचे दागिने व इतर असा एकूण 13लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना पुढ़ील तपासासाठी मुद्देमालासह या दोघां चोरट्यांना इंचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की,वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापुर जिल्हयात होत असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात होत असलेली वाढ़ ही चिंताजनक बाब असून त्याचा तात्काळ तपास करून उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकास दिल्या होत्या.या पथकातील पोलिसांनी काही पथके तयार करून या गुन्ह्याचा शोध घेत असताना रेकॉर्ड वरील गुन्हेगार रियाज कुचनूर आणि बंजरंग चौधरी या दोघांनी इंचलकरंजी भागात घरफोडी केली असून घरफोडीतील सोन्याचे दागिने विकण्यासाठी मंगळवार दि.22/07/2024 रोजी इंचलकरंजी मार्गे हुपरी येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी इंचलकरंजीतील नदीवेस नाका येथे सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांच्या कडील 217gm.सोन्याचे दागिने,रोख पंधरा हजार रुपये.आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एकूण 13 लाख 93 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने शुभम पाटील याला विकल्याचे सांगून पोलिस शुभम पाटील यांचा शोध घेत आहेत.
आरोपींच्या कडुन उघडकीस आलेले गुन्हें इंचलकरंजी पोलिस ठाण्यात येथे दाखल असलेले 10लाख 46हजार 600/ रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शहापूर पोलिस ठाण्यात येथे दाखल असलेला 11000/रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्याच प्रमाणे इंचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला 3 लाख 56 हजार 400/रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वरील प्रमाणे तीन घरफोडीचे गुन्हे उघकीस आणले असून यातील आरोपी रियाज कुचनूर याच्यावर दोन गुन्हे दाखल असून बंजरग चौधरी यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे ,अतिश म्हेत्रे पोलिस सतीश जंगम ,संजय कुंभार, प्रशांत कांबळे,अमित सर्जे,महेश खोत,सागर माने,राज कांबळे,सुशील पाटील,व सचिन बेंडखळे यांनी केली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636