पोलिस पदक पुरस्कार प्राप्त निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त भय्यासाहेब इनामदार यांचे निधन
पुणे : (प्रतिनिधी)
कोथरूड येथील हॉटेल कोकण एक्स्प्रेस जवळ राजलक्ष्मी अपार्टमेंट मधील रहिवासी निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त भय्यासाहेब सिद्धेश्वर इनामदार यांचे निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ९६ वर्षे होते.
निवृत्त महाराष्ट्र पोलीस संचालक कै.अरविंद इनामदार यांचे मोठे बंधू.
त्यांच्या पश्चात पुतण्या जयंत इनामदार व कुटुंबीय आहेत.गुणवत्ता पूर्ण सेवेबद्दल १९८२ साली भय्यासाहेब यांना पोलिस पदक पुरस्कार प्राप्त झाला होता.
महाराष्ट्रातील सातारा,भुईंज,महाबळेश्वर, पन्हाळा ,महाराष्ट्र राज्य वाहतूक शाखा पुणे,पुणे ग्रामीण,पुणे शहर येथे कार्यरत असतांना एक उत्कृष्ट पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. १९५० मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले.सहाय्यक पोलिस आयुक्त लष्कर विभाग पुणे येथून ३१.१२.८५ रोजी निवृत्त झाले होते.
भय्यासाहेब यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील तडसर.पुण्यातील वाडिया महाविद्यालय येथे शिक्षण झाले होते. वैकुंठ मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636